ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनची दुसरी बाजू; राज्यातील गुन्हेगारी घटली

भारतात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशातील लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय सर्वकाही ठप्प झाले असून नागरिक घरात अडकून पडले आहेत. यामुळे राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. पाहुयात याबाबतचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा.

crime rate drastrically reduced amid lockdown
author img

By

Published : Apr 11, 2020, 10:59 PM IST

मुंबई - कोरोनामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. भारतात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशातील लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय सर्वकाही ठप्प झाले असून नागरिक घरात अडकून पडले आहेत. यामुळे राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. पाहुयात याबाबतचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा.

आता पाहुयात जिल्हानिहाय गुन्हेगारीची आकडेवारी -

मुंबई -

राज्यात 22 मार्च ते 11 एप्रिल या काळामध्ये एकूण 35,383 गुन्हे नोंदविण्यात आले असून क्वारंटाईनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 475 जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 70 घटना आतापर्यंत घडल्या असून या गुन्ह्यात 161 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोव्हिड - 19 च्या संदर्भात 61056 फोन कॉल्स 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले असून अनधिकृत वाहतुकीचे 803 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनधिकृत वाहतूकप्रकरणी 2525 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 19,657 वाहन जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 1 कोटी 23 लाख 35 हजारांचा दंड ठोठावला आहे. राज्यात कलम 144 व 188 नुसार पुणे शहरातून सर्वाधिक 4583 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 2808 , नागपूर शहर 2311 , नाशिक शहर 2255 , सोलापूर 3021 , अहमदनगर 3388 , गुन्हे नोंदविण्यात आले असून सर्वाधिक कमी गुन्हे (48) अकोला येथे नोंदविण्यात आले आहेत.

ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनची दुसरी बाजू; राज्यातील गुन्हेगारी घटली
ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनची दुसरी बाजू; राज्यातील गुन्हेगारी घटली

क्राईम कॅपिटल नागपुरात गुन्हेगारीला आळा -

संचारबंदीमुळे शहरातील गुन्हेगारी घटनांवर आळा बसला आहे. क्राईम कॅपिटल म्हणून नेहमी चर्चेत राहणाऱ्या नागपुरात लॉकडाऊन दरम्यान गुन्हेगारी घटनांमध्ये कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. मात्र, या काळात शहरात दोन खुनाच्या घटना देखील घडलेल्या आहेत. नागपूर पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या प्रेस नोटमध्ये गुन्हेगारी घटनांची मोठी यादीच प्रसिद्ध केली जायची. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागपूर पोलिसांच्या प्रेस नोट रिकाम्याच राहत आहेत.

गेल्या आठवड्याभरात तर शहरात किरकोळ घटना वगळता एकही मोठी घटना घडलेली नाही. सध्या नागपूर पोलीस शहरातील बंदोबस्तात व्यस्त असून विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करूनच समाधान मानावे लागत आहे. एरव्ही नागपूर शहरात खून, बलात्कार, चोरी आणि दरोड्याच्या घटना रोज घडायच्या. मात्र, आता ही मालिका खंडित झाली आहे

ठाण्यात गुन्हेगारांचाही "लॉकडाऊन"-

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या पोलीस ठाण्यात नेहमीच गुन्ह्यांच्या नोंदीची भरमार असते. चोरी, घरफोडी, वाहन चोरी, हल्ला, मारामारी, जबरी चोरी, विनयभंग, सोनसाखळी चोरी अशा विविध गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. जवळपास २० दिवसांपासून ठाण्याच्या विविध ३६ पोलीस ठाण्यात केवळ ९ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.

लॉकडाऊननंतर जवळपास २० दिवस ठाण्याच्या विविध पोलीस ठाण्यात अपवाद ठरलेल्या केवळ ९ गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. यामुळे ठाण्यात गुन्हेगारांचाही लॉकडाऊन झाला आहे. गुन्हा नोंदित मोठी घट झालेली असल्याचा दावा पोलीस सुत्रांनी केला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील हद्दीत तब्बल ३६ पोलीस ठाणे आहेत. यात काही ठाण्यांमध्ये नित्यनियमाने चोरीचे, जबरी चोरीचे आणि विनयभंगाचे, हाणामारीचे डझनभर गुन्हे दाखल होत होते.

देशात आणि राज्यात कोरोनाचा ससेमिरा लागल्याने त्याचा चोख बंदोबस्त करण्यासाठी सरकारने "लॉकडाऊन" केल्याने आणि नाक्यानाक्यावर भटक्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावल्याने आणि रस्त्यावर वाहनांची किरकोळ वाहतूक असल्याने चोरट्यांनीही आणि गुन्हेगारांनी लॉकडाऊनमध्ये सहभाग घेतल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळाले आहे.

नाशकात गुन्हेगारीत ८० टक्के घट -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ह्याचा परिणाम गुन्हेगारीवरदेखील झाला आहे. एकट्या नाशिक शहरातील गुन्हेगारीत तब्बल 80 टक्क्यांची घट झाली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असून रस्त्यावर ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे आणि सर्वच नागरिक घरात असल्याने ह्याचा परिणाम गुन्हेगारीवर झाला आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, चोऱ्या, चेन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी, मोबाइल चोरी ह्या घटनांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे साहजिक पोलीस ठाण्यात देखील तक्रारदारांची संख्या कमी झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात शासन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कलम 188 कायद्यांतर्गत 2155 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची 1365 वाहने जप्त करण्यात आली आहे.

सांगलीत गुन्हेगारीत झपाट्याने घट -

शहरातील गुन्हेगारीत झालेली घट, जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊन यामुळे सर्वच व्यापार ठप्प आहेत. लोक आपापल्या घरात राहत आहेत. रस्त्यांवर दिवसरात्र पोलिसांचा कडा पहारा आहे. सुरुवातीच्या काळात काही अपवाद वगळता चोरीच्या एक-दोन घटना शहरात घडल्या. याव्यतिरिक्त चोरीच्या तसेच खून, मारामारी अशा कोणत्याही घटना याकाळात घडल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये जवळपास ९९ टक्क्यांची घट झाली आहे.

जळगावात गुन्हेगारीला आळा -

जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वावर संचारबंदीचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख निम्म्यांहून अधिक घटला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस दलाकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू होण्याच्या एक आठवडाआधी जिल्ह्यात हाणामारी, दंगल, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार यासारखे १४१ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत तर संचारबंदी लागू झाल्यापासून आठवडाभरात हाच आकडा निम्म्यांहून अधिक घसरून अवघ्या ६२ वर आला आहे.

दरम्यान याच कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अन्वये जवळपास १०० गुन्हे दाखल झाले आहेत. १५ मार्चपासून जिल्ह्यात ५६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात अवैध दारु विक्रीचे ९०, जुगाराचे २४, आत्महत्या, अकस्मात मृत्यू ९१ व आगीच्या ५ घटना घडल्या आहेत. सध्याच्या काळात चोऱ्या, हाणामाऱ्या, वाहन चोरी अशा प्रकारचे गुन्हे कमी झाले आहेत.

संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर असल्याने हे गुन्हे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ मार्चनंतर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन, परदेश प्रवासाची माहिती लपवणे, फेक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल करणे, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा धार्मिक भावना भडकवणारा मजकूर व्हायरल करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

अशी आहे गुन्ह्यांची स्थिती -

१५ ते २१ मार्च गंभीर गुन्हे - १४१

२२ ते २९ मार्च गंभीर गुन्हे - ६२

१५ ते २९ मार्च एकूण गुन्हे - ५६८

कोरोना संदर्भात आदेशाचे उल्लंघन - सुमारे १००

संचारबंदीमुळे रस्ते ओस आहेत. यामुळे साहजिक प्रदूषणही कमी झाले आहे. तसेच गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येते. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी झाल्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडालेला असताना या काही दिलासादायक गोष्टीही आपल्या आजुबाजूला घडताना दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.