ETV Bharat / state

काँग्रेसच्या घोषणापत्रात पर्यावरणचा मुद्दा, तज्ज्ञांनी केले स्वागत

author img

By

Published : Apr 8, 2019, 8:00 PM IST

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने घोषणापत्र जाहीर केले असून यात पर्यावरण विषयक मुद्यांचा समावेश आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक

मुंबई - आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचे घोषणापत्र जाहीर झाले आहे. यात पर्यावरण विषयक मुद्यांचा समावेश असल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांनी आज मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत भाग घेतला.

मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक

मुंबईतील गांधी भवन या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीत पर्यावरण क्षेत्राशी निगडित महत्वाचे काम करणाऱ्या व्यक्तींनी भाग घेतला. या बैठकीत पर्यावरण विश्लेषक म्हणून सुमेरा अली, डबी गोयंका, गिरीश राऊत, अ‍ॅड. अब्राहम रेगील सारखे नामवंत लोक सहभागी झाले होते.

बैठकीत पर्यावरण विषयक १८ मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यात नदी, पाणी, वायू प्रदूषण, मृदा, वाढते औद्योगिकरण सारख्या मुद्यांवर विस्तीर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीतून तज्ज्ञ मंडळींनी सुचविलेल्या गोष्टी काँग्रेसचे सरकार आल्यास प्रभावीपणे अंमलात आणल्या जाणार आहेत. यामुळे पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाच्या घोषणपत्रात पर्यावरण विषयी गोष्टींचा उल्लेख केल्याने पर्यावरण तज्ज्ञांनी याचे स्वागत केले आहे.

Intro:आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा घोषणापत्र जाहीर झाले असून यात काँग्रेसने पर्यावरण विषयी मुद्दे त्यांच्या घोषणापत्रात जाहीर केल्याने पर्यावरण तज्ज्ञांनी आज मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत भाग घेतला.. मुंबईतील गांधी भवन या ठिकाणी पार पडलेल्या बैठकी दरम्यान पर्यावरण क्षेत्राशी निगडित महत्वाचे काम करणाऱ्या व्यक्तींनी या बैठकीत भाग घेतला. या बैठकीत पर्यावरण विश्लेक्षक म्हणून सुमेरा अली, डबी गोएंका, गिरिश राऊत , एड अब्राहम रेगील सारख्या नामवंत लोकांनी भाग घेतला.

Body: बैठकीत पर्यावरण विषयक 18 मुद्यांवर चर्चा करण्यात आली ज्यात नदी , पाणी , वायू प्रदूषण , मृदा , वाढते औद्योगिकरण सारख्या मुद्यांवर विस्तीर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीतून तज्ञ मंडळींनी सुचविलेल्या गोष्टी सरकार आल्यास प्रभावीपणे अमलात आणल्या जाणार आहेत. या मुळे पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाच्या घोषणपत्रात पर्यावरण विषयी गोष्टींचा उल्लेख केल्याने पर्यावरण तज्ञांनी याचे स्वागत केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.