ETV Bharat / state

राज्यात सुरु होणार 'फिव्हर क्लिनिक', सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लढाईत सामील होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सर्दी, खोकला आणि तापाच्या तपासणीसाठी फिव्हर क्लिनिक उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांच्यासाठी एक तर अधिक लक्षणे असल्यास दुसरे वेगळे हॉस्पिटल सुरु केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर, गंभीर आणि तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी तिसरे वेगळे हॉस्पिटल सुरु केले जाणार आहे. येथे किडणी, मधुमेह, श्वसनाचे विकार यावर निष्णात डॉक्टर्स उपचार करतील.

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 8, 2020, 3:15 PM IST

Updated : Apr 8, 2020, 3:41 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राज्य सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमाद्वारे केलेल्या जनसंवादात सांगितले. राज्यात तीन प्रकारच्या फिव्हर क्लिनिक सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी जनतेला दिली. त्यासोबतच सैन्यातील निवृत्त आरोग्य कर्मचारी, निवृत्त आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाशी लढा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील लोकांना आवश्यक असलेले पीपीई किट राज्यातच तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तसेच सॅनिटायझरही आपण बनवायला लागलो असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मास्कबद्दल दिल्या सूचना -

१)कॅबिनेटमध्ये आम्ही सगळे मास्क लावून बसलो होतो. आता प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर निघाले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.

२) मास्क दुकानातूनच घेतले पाहिजे असे नाही. स्वच्छ कापड नाक आणि तोंडाला बांधावे. ते रोज धुवून वापरावे.

३) वापरलेला मास्क रस्त्यावर फेकू नका. त्याची विल्हेवाट अत्यंत सुरक्षितपणे लावा. वापरलेला मास्क जाळून टाकावा. त्याची राख पिशवीत घेऊन कचऱ्याच्या पेटीत टाकावी.

फिव्हर क्लिनिक सुरु करणार -

सर्दी, खोकला आणि तापाच्या तपासणीसाठी फिव्हर क्लिनिक उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांच्यासाठी एक तर अधिक लक्षणे असल्यास दुसरे वेगळे हॉस्पिटल सुरु केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर, गंभीर आणि तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी तिसरे वेगळे हॉस्पिटल सुरु केले जाणार आहे. येथे किडणी, मधुमेह, श्वसनाचे विकार यावर निष्णात डॉक्टर्स उपचार करतील.

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे

निवृत्त सैनिकांना आवाहन -

सध्या कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. अशात आरोग्यसेवेसाठी प्रशिक्षित असलेले, सैन्यात मेडिकल कोअरमध्ये काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय यांनाही मुख्यमंत्र्यांनी या युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सध्या महाराष्ट्राला त्यांची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हा काळ विषाणूच्या गुणाकाराचा -

आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने विलगीकरणात २१ हजार नागिकांना ठेवले आहे. आयसोलेशनमध्ये २२०० तर, १५ ते १७ हजार नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ८० कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. तर, ६४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आता सरकार रुग्ण हॉस्पिटलला येण्याची वाट पाहात नाही. त्याऐवजी वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन चाचणी करत आहे. रॅपिड टेस्ट किट हे जास्तीत जास्त महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णांचा आकडा शुन्यावर आणण्यासाठी त्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. अमेरिका जर आपल्याला औषधे मागत असेल, तर आपल्याला सुरक्षित राहाणे गरजेचे आहे. आपले घरच आपले गड-किल्ले आहेत. त्यामुळे, घरातच राहा, सुरक्षित राहा, असा सल्ला त्यांनी दिला

Last Updated : Apr 8, 2020, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.