ETV Bharat / state

फोटो मॉर्फ प्रकरण : चित्रा वाघ यांच्याकडून मुंबई सायबर पोलिसात तक्रार दाखल - chitra wagh photo morf case update

चित्रा वाघ यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन फोटो मॉर्फिंग प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली. चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

Chitra Wagh file complaint
चित्रा वाघ यांच्याकडून मुंबई सायबर पोलिसात तक्रार दाखल
author img

By

Published : Mar 2, 2021, 7:33 PM IST

मुंबई - फोटो मॉर्फप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट चित्रा वाघ यांनी घेतली. यावेळी त्यांनी फोटो मॉर्फिंगप्रकरणी वाघ यांनी तक्रार दाखल केली.

chitra wagh file complaint to mumbai cyber police over photo morf case
चित्रा वाघ यांच्याकडून मुंबई सायबर पोलिसात तक्रार दाखल

संजय राठोडांसह फोटोचे मॉर्फिंग -

चित्रा वाघ यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन फोटो मॉर्फिंग प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली. चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि शिवसेना नेते संजय राठोड एकमेकांच्या जवळ उभे असल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात चित्रा वाघ आणि त्यांचे पती किशोर वाघ यांचा जुना फोटो मॉर्फ करण्यात आला होता.

पूजा आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, मला काहीही फरक पडत नाही. तुम्ही कितीही काही केले तरी पूजाला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. राजीनामा झाला म्हणजे लढाई जिंकली नाबी. शेवटपर्यंत लढत राहणार. तुम्ही मला कितीही मानसिक त्रास दिलात तरी मी शांत राहणार नाही. मी तुम्हाला पूर्ण नडून आणि भिडून उरणार', असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर केला आहे.

हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवारांची वीज तोडणीला स्थगिती; दोन दिवसात विजेच्या प्रश्नावर तोडगा काढणार

तुम्ही कितीही चौकशी करा आम्ही घाबरत नाही -

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणीत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबै बँकेचा सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. दरम्यान, नाबार्डच्या २०१८-१९च्या अहवालामध्ये बँकेच्या कामकाजावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की 'तुम्ही कितीही चौकशी करा, आम्ही घाबरत नाही', असे स्पष्टीकरण चित्रा वाघ यांने दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.