मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुचर्चित 'तान्हाजी' चित्रपट आज (मंगळवारी) सायंकाळी 6 वाजता पाहणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंसोबत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी आणि सर्व नगरसेवक हा चित्रपट पाहणार आहेत. यासाठी दादरच्या प्लाझा चित्रपट गृहात विशेष शो चे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - तान्हाजी मालुसरेंचे जन्मगाव आजही वंचितच; चित्रपटावर ग्रामस्थ नाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शूर मावळा म्हणून तान्हाजी मालूसरे यांची ओळख आहे. तान्हाजी मालूसरे यांच्या जीवनावर आधारीत असलेला 'तान्हाजी' हा हिंदी चित्रपट दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी योद्धा सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आली आहे. 'तान्हाजी' चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला असून या चित्रपटात अभिनेता अजय देवगण याने तान्हाजी मालुसरेंची भुमिका साकारली आहे.