मुंबई - प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने सहा मेल, एक्स्प्रेस 17 जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामध्ये पुणे-सोलापूर एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्सप्रेस, एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसचा समावेश आहे.
मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याने रेल्वेने प्रवास करणारी प्रवासी संख्या घटत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. उन्हाळ्यातील विशेष गाड्या, सुट्टीकालीन विशेष गाड्यांना प्रवाशांनाचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने राज्यांतर्गत, राज्याबाहेरील अनेक मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या. तर आता पुन्हा मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात येत येत आहेत.
या सहा मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द -
१) ०११५७ पुणे - सोलापूर विशेष (आठवड्यातून पाच दिवस) दि. १ जून २०११ ते १५ जून २०२१ पर्यंत सुटणारी.
२) ०११५८ सोलापूर - पुणे विशेष (आठवड्यातून पाच दिवस) दि. १ जून २०११ ते १५ जून २०२१ पर्यंत सुटणारी.
३) ०७६१३ पनवेल - हजूर साहिब नांदेड विशेष दि. २ जून २०११ ते १६ जून २०२१ पर्यंत सुटणारी.
४) ०७६१४ हजुर साहिब नांदेड-पनवेल दि. १ जून २०११ ते १५ जून २०२१ पर्यंत सुटणारी.
५) ०८५१९ विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. १ जून २०११ ते १५ जून २०२१ पर्यंत सुटणारी.
६) ०८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम विशेष दि. ३.६.२०११ ते १७.६.२०२१ पर्यंत सुटणारी.