ETV Bharat / state

Big Breaking News - व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन

Breaking
Breaking
author img

By

Published : Oct 4, 2021, 7:03 AM IST

Updated : Oct 4, 2021, 10:46 PM IST

22:41 October 04

व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरात डाऊन झाले आहेत. फेसबुकच्या प्रवक्त्याने असे म्हटले आहे की, सर्व काही सुरळीत करण्याचे कंपनी काम करत आहे. 

20:04 October 04

पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरूवात

पुण्यात गेल्या एक दीड तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

18:36 October 04

Drugs Party Case : एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणात गोरेगावातून आणखी एका अटक

मुंबई - नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने श्रेयस नायरला गोरेगाव येथून ड्रग्ज प्रकरणात अटक केली. त्याचा आर्यन खानशी संबंध असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे.

17:48 October 04

आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

Cruise ship party case

मुंबई - ड्रग्स पार्टी प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने आर्यन खान, अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत रवानगी केली आहे. एनसीबीकडून न्यायालयात 9 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती.

15:56 October 04

आर्यन खानसह तिघांवर गुन्हा दाखल, एनसीबीकडून 9 दिवसांच्या कोठडीची मागणी

मुंबई - आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्यावर 8 सी, 20, 27 आणि 35 एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एनसीबीसीचे अधिकारी एएसजी अनिल सिंह यांनी किला न्यायालयात सांगितले आहे. याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक केली असून त्यांचीही चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, एनसीबीने आणखी 9 दिवसांची कोठडी मागितली आहे

15:20 October 04

गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई - मुलुंड पोलिसांनी गीतकार जावेद अख्तर यांच्यावर आरएसएसची तालिबानशी तुलना केल्याच्या कथित विधानावरून गुन्हा नोंदवला आहे. एका वकिलाने याबाबतची तक्रार पोलिसात दिली होती.

15:07 October 04

Drugs Party Case : आर्यन खानसह सर्व आरोपी किला न्यायालयात दाखल

कॉर्डीला क्रुझ ड्रग्स प्रकरणातील आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज खान यांच्यासह सर्व आरोपींना किला कोर्टात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार NCB ही आर्यनच्या कोठडीत मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे. 

15:02 October 04

प्रियंका गांधींना सरकार घाबरलं - काँग्रेस नेते सचिन पायलट

मुंबई - काँग्रेस नेते सचिन पायलट यांची मुंबईत पत्रकार परिषद सुरू आहे, यावेळी लखीमपूर खिरी येथे झालेल्या घटनेवर बोलतांना ते म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला जे दाबू शकले नाहीत ते आता त्या विरोधात भाजपा हे आक्रमक झाला आहे. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. राज्याची तपास यंत्रणा याची चौकशी करू शकत नाही. त्यामुळे जुडीशीयल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.  

प्रियंका गांधी यांना पूर्ण रात्रभर त्यांनी जाऊ दिले नाही. प्रियंका गांधी यांच्याबरोबर केलेले व्यवहाराने हे सरकार घाबरलं असल्याचे दिसत आहे, असे ते यावेळी म्हणाले. 

13:16 October 04

मुंबई -

कॉर्डींया द क्रूझवर पुन्हा छापेमारी सुरू

एनसीबी प्रमुख समीर वानखडेच्ये नेतृत्वात पुन्हा क्रूझची तपासणी

या तपासात आणखी काहींना अटक करण्यात आल्याची माहिती

या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांचे धागेदोरे असल्याचा एनसीबीला संशय

यामुळे आज समीर वानखेडे आणि त्यांची टीम ॲक्शन मोडमध्ये

13:03 October 04

मुंबई -

एनसीबीचे पथक अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह त्याच्या मित्रांना पुन्हा मेडिकल टेस्टसाठी जेजे रुग्णालयात नेले आहे.

टेस्टनंतर आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीकडून आर्यनसह त्याच्या मित्रांची कोठडी वाढून मागण्यात येणार आहे.

तर आर्यन खानला आज जामीन सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

12:17 October 04

मुंबई -

ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासहीत दोघांना पुन्हा मेडिकलसाठी नेण्यात आले

नंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर केले जाणार

एनसीबीची टीम या सर्वांना घेऊन जे जे रुग्णालयात दाखल

12:04 October 04

माळशिरस -

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस शहरातील संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावरील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी पंढरपूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. मात्र शहरातील शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात माळशिरस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दीड तास शेतकर्‍यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची नेते सोमनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

10:05 October 04

अमरावतीच्या मार्डीत चाकूच्या धाकावर दरोडा;35-40 लाखांचा ऐवज लंपास

अमरावती ब्रेकिंग -

अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मार्डी गावात रात्री वाजता एका घरी अज्ञात ६ दरोडेखोरांनी धाकुच्या धाकावर दरोडा टाकला. यात ३५ ते ४० लाख रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. रमेश साव रा.मार्डी यांच्या घरी हा दरोडा पडला आहे. रात्री घरी सर्व जण झोपले असताना ६ जण घरात घुसले. घरात तसेच झोपून राहा उठू नका असे म्हणत सर्वांना चाकूचा धाक आरोपी दरोडेखोरांनी दाखवला. रोख रक्कम ५०० ते ६०० ग्रॅम सोने व एक किलो चांदी असा एकूण ४० लाखाचा ऐवज चोरटे घेऊन पसार झाले. डॉग पथक ठसे तज्ञांसह पोलीस घटनेचा संपूर्ण तपास करीत असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

09:40 October 04

अहमदनगर जिल्हा अपडेट

अहमदनगर अपडेट

जिल्ह्यातील 61 गावे १० दिवसांसाठी बंद , दहा पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील 24 गावांचा समावेश

राहाता - कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने तालुक्यातील 7 गाव बंद करण्यात आली आहे

राहाता - समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या  विरोधात पुन्हा कायद्याची लढाई सुरु करणारण्याची आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची तयारी

संगमनेर - सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन

कोपरगाव- सुरेगाव कोळपेवाडी परीसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध्य धंदे बंद करण्याची मागणी

कोपरगाव - उजनी उपसा सिंचन योजना अंतर्गत तलाव गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून देण्याची माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मागणी

अकोले - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई गडावरील देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय

09:27 October 04

उत्तर प्रदेश -

शेतकऱ्यांनी भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी यांच्याविरुद्ध टिकुनिया, लखीमपूर खेरी येथे कालच्या घटनेबद्दल तक्रार दाखल केली. काल शेतकरी काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. यावेळी अजय मिश्रा टेनींचा मुलगा आशिषने आंदोलकांवर गाडी घातली. यात एकूण 8 जण चिरडले. याप्रकरणी शेतकऱ्यांनी आता तक्रार दाखल केली आहे.

09:24 October 04

मुंबई -

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या घटनेचे पडसाद रविवारी दिवसभर उमटल्याचं दिसून आलं. 

एनसीबीने रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. आता अमली पदार्थ पुरवणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याने कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अमली पदार्थ पुरवले जाते? यासंदर्भातील पुरवठा साखळी आणि इतर महत्वाची माहिती एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

08:41 October 04

मुंबई - काळबादेवीला इमारत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू

मुंबई फ्लॅश

- काळबादेवी येथे काल रात्री एका म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला होता.

- घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाने इमारत रिकामी केली.

- ढिगाऱ्या खाली अडकलेल्या सुंदरा सॉ या 61 वर्षीय महिलेला जे जे रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला

08:17 October 04

पंढरपूर - भीमा नदी पात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई

पंढरपूर शहरातून अवैधरित्या भीमा नदी पात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक जेसीबी, एक टिपर यांच्यासह चार ब्रास वाळू 27 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

07:04 October 04

मुंबई -

अंधेरी येथील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागलीय

मुंबई अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

आग नियंत्रणात आल्याचे समजते आहे 
 
06:47 October 04

मुंबई -

आर्यन खानच्या अटकेनंतर अभिनेता सलमान खान शाहरुख खानच्या घरी पोहोचला.

एनसीबीने शाहरुख खानच्या मुलाला ड्रगच्या प्रकरणात अटक केली आहे.

सलमान त्याच्यामागे पोहोचला आहे.

गोव्याला जाणाऱ्या क्रूजवरील पार्टी प्रकरणी आर्यनसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने आधीच अटक केली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे स्वतः या प्रकरणात मुख्य भूमिका बजावत आहेत. दरम्यान, आर्यन खानसह तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडीही काल सुनावण्यात आली. या तिघांच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे.

06:28 October 04

Big Breaking - लखीमपूर शेतकरी हत्याकांड, मृतांच्या कुटुंबियांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना अटक

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. येथील लखीमपूर येथे काल शेतकरी काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. यावेळी एका भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलकांवर गाडी घातली. यात 4 शेतकऱ्यांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. यानंतर प्रियांका गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जात होत्या. प्रियांका गांधी मध्यरात्रीच लखीमपूरकडे रवाना झाल्या. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळी न जाण्यास सांगितले होते. मात्र प्रशासनाकडे कोणताही आदेश आणि वॉरंट नसल्याने प्रियांका गांधी न जुमानता लखीमपूरकडे रवाना झाल्या. मात्र आता युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी दावा केलाय की, "प्रियांका गांधी यांना हरगाव येथून अटक करण्यात आली".

Last Updated : Oct 4, 2021, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.