ETV Bharat / state

Bombay HC on Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाकडून 27 एप्रिलपर्यंत अंतरिम दिलासा

author img

By

Published : Apr 13, 2023, 12:38 PM IST

Updated : Apr 13, 2023, 12:56 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना सत्र न्यायालयाने 14 एप्रिलपर्यंत अंतरिम दिलासा दिला होता. 14 एप्रिलनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतल्यामुळे उच्च न्यायालयाने आज त्यांच्या अर्जावर सुनावणी करत 27 एप्रिलपर्यंत अंतरिम दिलासा दिला. यामुळे मुश्रीफ यांना हा अंतरिम जरी असला तरी मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Hasan Mushrif
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ

मुंबई : सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्याबाबतचे आर्थिक गैरव्यवहार केला गेला. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा सहभाग असल्याचा कथित आरोप केला गेला. या संदर्भात विनायक कुलकर्णी या व्यक्तीने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली तसेच अंमलबजावणी संचलनालयाने त्यांच्या कार्यालय आणि घर येथे अनेक धाडी देखील घातल्या होत्या. त्याबाबतची हसन मुश्रीफ यांची महत्त्वाची चौकशी सुरू आहे.

चौकशी आणि तपासणी : चौकशी करीत असताना अंमलबजावणी संचलनालय हे कायदे आणि नियम बाजूला ठेवून जबरदस्तीने कारवाई करीत असल्याची तक्रार हसन मुश्रीफ यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाकडे केली होती. त्यामुळे त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जबरदस्तीने कोणतीही चौकशी संदर्भातली कारवाई होऊ नये. चौकशी आणि तपासणी सुरू राहील, असे म्हणत त्यांना दिलासा दिला होता.

उच्च न्यायालयामध्ये धाव : तसेच मुंबई सत्र न्यायालयामध्ये विशेष पीएमएलए न्यायालयात याबाबत देखील खटला सुनावणी सुरू होती. त्यामध्ये हसन मुश्रीफ यांचे तीनही मुले तसेच कथित सीए महेश गुरव यांच्या संदर्भात तिथे सुनावणी अद्यापही सुरू आहे. मात्र हसन मुश्रीफ यांच्याबाबतचा निकाल परवा सत्र न्यायालयाने दिला. त्यात त्यांना केवळ दोनच दिवसांसाठी अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता होती, म्हणून हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.

फेब्रुवारीमधील अंतरिम दिलासा : त्यानंतर आज या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर हसन मुश्रीफ यांचे वकील आबाद फोंडा यांनी न्यायालयासमोर मांडले की, उच्च न्यायालयाचा फेब्रुवारीमधील अंतरिम दिलासा देण्याचा जो आदेश आहे. तो पाहता आणि सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडे पाहता या संदर्भात त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. तसेच ईडीच्या वतीने देखील वकिलांनी मांडले, हे अंतरिम संरक्षण देऊ नये. यांची तपासणी गरजेची आहे. त्यासाठी आता हे अंतरिम संरक्षण न देता त्यांच्या अटकेची अनुमती आम्हाला द्यावी, अशी बाजू मांडली.

हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला : दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत सत्तावीस एप्रिलपर्यंत कोणतीही जबरदस्तीने कारवाई हसन मुश्रीफ यांच्यावर करता येणार नाही. तसेच त्या संदर्भात दोन आठवड्यांसाठी सुनावणी तहकूब देखील केली. याबाबत पुढील सुनावणी 27 एप्रिल 2023 रोजी होईल. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना हा मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : Hasan Mushrif Ed Raid: पुण्यात पुन्हा 9 ठिकाणी ईडीची छापेमारी हसन मुश्रीफ यांच्याशी कनेक्शन

Last Updated : Apr 13, 2023, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.