ETV Bharat / state

राज्याभरात भाजप एक हजार सभा घेणार; मोदींच्या होणार ८ सभा - उपाध्ये

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या सभा होणार आहेत.

राज्यात भाजप घेणार एक हजार सभा
author img

By

Published : Mar 29, 2019, 9:03 PM IST

मुंबई - देशभरात ११ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पाडत आहे. या टप्प्यात राज्यातही ७ जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. राज्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसह तब्बल एक हजार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी नरेंद्र मोदी यांच्या ८ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मोदींची पहिली सभा १ एप्रिलला वर्ध्यात होईल. तसेच इतर सभांचे वेळापत्रकही लवकरच सांगण्यात येईल, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या शिवाय, एखाद्या मतदारसंघात ताकत लावली तर ती जागा जिंकून येऊ शकते, असे आढळून आल्यास, त्या ठिकाणी कशी रणनीती आखता येईल, याकडेदेखील अमित शाह यांचे लक्ष असणार आहे, असेही उपाध्ये म्हणाले.

राज्यात भाजप घेणार एक हजार सभा

यामध्ये सर्वच सभांचा समावेश असून, या सभांसाठी राज्यातील तसेच केंद्रातील नेतेदेखील हजेरी लावणार आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या सभा होणार आहेत.

मुख्यमंत्री घेणार ७५ हून अधिक सभा
एकीकडे केंद्रातील नेत्यांच्या सभांचा बार उडत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात ७५ हून अधिक सभा घेणार आहेत. भाजपच्या २५ उमेदवारांसाठी प्रत्येकी दोन मिळून ५० तर शिवसेना उमेदवारासाठी प्रत्येकी एक सभा आशा २३ सभा मुख्यमंत्री घेणार आहेत.

Intro:राष्ट्रीय नेत्यांसह भाजपचा सभांचा धडाका, राज्यात होणार एक हजार सभा

मुंबई 29

देशभरात येत्या 11 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पाडत असून राज्यात ही सात जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने जय्यत तयारी केली असून तब्बल एक हजार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 1 तारखेला वर्ध्यात होणाऱ्या जाहीर सभेने प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
यामध्ये सर्वच सभांचा समावेश असून, या सभांसाठी राज्यातील तसेच केंद्रातील नेते देखील हजेरी लावणार आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ,या वरिष्ठ नेत्यांच्या समावेश आहे. तसेच राज्यातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन , विनोद तावडे , चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या सभा राज्यातल्या कणा कोपऱ्यात होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात आठ सभा आयोजित केल्या असून, याची सुरुवात वर्ध्यातून होत आहे. इतर सभांचे वेळापत्रक लवकरच केले जाईल असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. एखाद्या मतदारसंघात ताकत लावली तर ती जागा जिंकून येऊ शकते असे जर कुठे आढळले , तर त्या ठिकाणी कशी रणनीती आखता येईल याकडे देखील अमित शहा यांचे लक्ष असणार आहे.

मुख्यमंत्री घेणार 75 हुन अधिक सभा..

एकीकडे केंद्रातील नेत्यांच्या सभांचा बार उडत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात 75 हुन अधिक सभा घेणार आहेत. भाजपाच्या 25 उमेदवारांसाठी प्रत्येकी दोन मिळून 50 तर शिवसेना उमेदवारासाठी प्रत्येकी एक सभा आशा 23 सभा मुख्यमंत्री घेणार आहेत. Body:.......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.