ETV Bharat / state

'ऊर्जा मंत्री नितीन राऊतांच्या इच्छेला महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी किंमत दिली नाही'

author img

By

Published : Feb 1, 2021, 7:05 AM IST

कोरोना लॉकडाऊनच्या काळात घरोघरी जाऊन विद्युत मीटरचे रिडींग जमा करणे महावितरणला शक्य झाले नाही. त्यामुळे ग्राहकांना अंदाजे विजबीले देण्यात आली. मात्र, काही ग्राहकांना वापरापेक्षा जास्त बीले मिळाली. या प्रश्नावरून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण झाले.

Ganesh Naik
गणेश नाईक

नवी मुंबई - वाढीव वीजबिल माफ करावीत, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मनात होते. त्यांनी तसे बोलुनही दाखवले होते. मात्र, महाविकास आघाडीतील दुसऱया दोन पक्षांनी राऊत यांच्या इच्छेला किंमत दिली नाही, असे वक्तव्य भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी केले. राज्यात नागरिकांना महावितरण विभागाकडून आलेली अवाजवी वीजबिले कमी करावी, अशी भूमिका भाजपा नेते गणेश नाईक यांनी घेतली आहे. वीजबिलासाठी झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये ते सहभागीही झाले होते. त्यांनी पुन्हा वीज बिलांचा मुद्दा चर्चेत आणला आहे.

भाजपा नेते गणेश नाईक यांनी नितीन राऊत यांच्यावर टीका केली

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मताला किंमत नाही -

उर्जा मंत्री नितीन राऊत ही व्यक्ती चांगली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना मंत्री होतो, तेव्हा ते माझ्या खात्याचे राज्यमंत्री होते. कोरोना काळात आलेली अवाजवी वीजबिल माफ करावीत, असे राऊत यांच्या मनात होते. मात्र, त्यांच्या बरोबर आघाडीत असलेले दुसरे दोन पक्ष राऊत यांच्या इच्छेला किंमत देत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.