मुंबई - निवडणुका संपून त्याचे निकालही लागले आहेत. देशात नवीन सरकार शपथ घेणार आहे. मात्र, कार्यकत्यांमधली खडाजंगी संपण्याचे नाव घेत नाही आहे. निवडणुकांच्या काळात आरोप-प्रत्यारोप होत राहतात. हे आरोप आणि भांडण पोलीस ठाण्यापर्यंत सुद्धा पोहचते, मात्र पण अजून हे सत्र सुरूच आहे. आज मुंबई येथील अंटोपहिल पोलीस स्टेशनमध्ये भाजप विरोधात व्हॉट्सअॅप गृपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या बद्दल तक्रार नोंदवण्यात आली.
भाजपचे सायनचे मंडळ अध्यक्ष संदीप धाम यांनी ही तक्रार काँग्रेस चे सुदर्शन मंडलिक यांच्या विरोधात नोंदवली आहे. इंटरनेटच्या महाजालातील व्हॉट्सअॅप या सोशल नेटवर्कींग अॅपवर भाजप बद्दल आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याप्रकरणी मुंबईत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भाजपची आक्षेपार्ह पोस्ट माध्यमावर फिरकत असताना कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुदर्शन मंडलिक नावाच्या व्यक्तीने भाजपबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअॅप टाकल्याने तक्रार करण्यात आली आहे. यावर पोलिसांनी योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे.