ETV Bharat / state

BEST : बेस्टला कर्ज फेडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ४५० कोटी

बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना परिवहन सेवा दिली जाते. बेस्ट उपक्रम गेले काही वर्षे आर्थिक अडचणीत आहे. यासाठी वेळोवेळी बेस्टने पालिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. दैनंदिन व्यवहारासाठी घेतलेले अल्प मुदतीचे ४५० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी मुंबई महापालिकेने बेस्टला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रत्येकी १५० कोटी रुपये उपक्रमाला देण्यात आले आहेत.

BEST
बेस्टला कर्ज फेडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ४५० कोटी
author img

By

Published : Jan 15, 2023, 6:31 PM IST

मुंबई : प्रलंबित विद्युत देणी देण्याकरीता ऑगस्ट २०२२ पर्यंत १७७४ कोटी व बेस्ट उपक्रमाच्या दैनंदिन कामकाजाचा खर्च चालवण्यासाठी बेस्टने ४५० कोटी रुपये घेतले होते. हे ४५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी २२२४ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची मागणी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांनी २२ ऑगस्ट २०२२ रोजी पालिका प्रशासनाकडे एका पत्राद्वारे केली होती.

६०३३.८५४ कोटीचे अधिदान करण्यात आले : बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना परिवहन सेवा दिली जाते. पालिकेकडून सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व आणि उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन सन २०१९-२० पासून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील सप्टेंबर २०२२ पर्यंत करण्यात आलेल्या तरतुदींमधून २४०३ कोटी रुपये व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम म्हणून नोव्हेंबर २०२२ पर्यंत ३६३० कोटी रुपये अशाप्रकारे एकूण ६०३३.८५४ कोटी एवढ्या रकमेचे अधिदान करण्यात आले आहे.

हेही वाचा : ओपन डेक बसमधून बेस्टला अडीच लाखांचा महसूल

४५० कोटीची मदत : यापूर्वी पालिकेने उपक्रमास निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी सुमारे ४८२.२८ कोटी रुपये रक्कम दिली होती. आता बेस्ट उपक्रमाने टाटा पॉवर कंपनीची प्रलंबित विद्युत देणी भागवण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी ४५० कोटी रुपयांची रक्कम बेस्टने पालिकेकडे मागितली आहे. रक्कम वापराचा सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत तसेच अल्प मुदतीचे कर्ज फेडण्यासाठी दिलेल्या ४५० कोटी रुपयांच्या रकमेबाबतचा अहवाल तीन महिन्यांत पालिकेला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तीन महिन्यांत प्रत्येकी १५० कोटी रुपये उपक्रमाला देण्यात आले : बेस्ट उपक्रम गेले काही वर्षे आर्थिक अडचणीत आहे. यासाठी वेळोवेळी बेस्टने पालिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. दैनंदिन व्यवहारासाठी घेतलेले अल्प मुदतीचे ४५० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी मुंबई महापालिकेने बेस्टला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रत्येकी १५० कोटी रुपये उपक्रमाला देण्यात आले आहेत.

तूट कमी करण्यासाठी प्रयत्न : कृती आराखडयानुसार बेस्ट उपक्रमाने कामांचे नियोजन करण्याची गरज आहे. खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमतेचा स्तर वाढविण्यासाठी मोठ्या सुधारणा करण्याचीही आवश्यकता असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. उपक्रमाच्या हिताच्या दृष्टीने आणि उपक्रमास प्रवासीकेंद्रीत, कार्यक्षम बनविणे, तूट कमी करणे याकरिता बेस्ट प्रशासनाकडून योग्य तो प्रयत्न करायला हवा, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : जानेवारी अखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात ५ एसी डबल डेकर बस होणार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.