मुंबई : आधि प्रेमाचे आमिष त्यातुन मग फसवणूक आणि मग खंडणीची मागणी धमक्या देत पैसे उकळून छळ केल्याची प्रकरणे सोशल माध्यमाचा वापर करत मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याची अनेक प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. या सगळ्या प्रकारात एक शडयंत्र रचले जाते. असेच काहीसे प्रकार सध्या इंस्टाग्रामवर घडताना पहायला मिळत आहेत. जर इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर सेक्सबॉट्स तुम्हाला लाईक करत आहेत. हे तुमच्यासाठी सामान्य वाटत असले तरी, त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक असू शकतात.
यात सर्वात आधि तुम्हाला हे सेक्सबॉट्स नेमके काय आहेत हे समजून घ्यावे लागेल. बॉटहा या संदर्भातला सामान्य शब्द आहे. याचा साधा सोपा अर्थ फेक अकाउंट्स असा आहे. सेक्सबॉट्स हे असे अकाऊंट आहेत ज्यात लोकांना अडकवण्यासाठी ते लोक अश्लील आणि तुम्हाला आकर्षीत करणारे फोटो पोस्ट करत असतात. तुम्ही त्यांच्या प्रोफाईल मधे फिशिंग लिंक शोधू शकता. ही खाती तुम्हाला नकळतपणे फॉलो करत असतात. ही खाती तुमच्या इंस्टाग्राम आयडीवर इतर कोणापेक्षा जास्त लक्ष ठेवत राहतात.
हे बॉट्स म्हणजे फेक अकाउंट वाले लोक नेमके काय करतात तर ते तुम्हाला जाळ्यात अडकवतात 2022 च्या अखेरीस, अनेकांना त्यांच्या इन्स्टाग्राम वरील पोष्ट तसेच नवीन प्रोफाईलद्वारे पाहिल्या आणि पसंत केल्या जात असल्याचे दिसून आले आहे. या युजर्सचे इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक होते. काही वापरकर्त्यांनी तपासल्या नंतर असे समोर आले आहे, की ही खाती सेक्सबॉट्स म्हणजे फसवणुक करणारे आहेत.
इन्स्टाग्राम किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अशी खाती असणे नवीन नाही. वर्षानुवर्षे अशी खाती अस्तित्वात आहेत, जी इंस्टाग्रामवर लोकांना अडकवण्याचे काम करतात. अशा खात्याच्या जाळ्यात सर्व सामांन्य लोक अडकतात. ते तुमच्या नकळत तुमची माहिती काढतात आणि त्यानंतर मग तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकायला सुरवात होते. त्या नंतर ते तुम्हाला भुलवतात आणि तुमच्या एका चुकी मुळे तुम्ही सेक्सटोर्शनचे बळी होऊ शकता.
अनेक लोक सेक्सबॉट्सला गांभीर्याने घेत नाहीत. त्यांना त्यांच्या पोस्ट मजेदार वाटतात त्यामुळे त्या पाहत राहतात त्यांच्याकडून आलेल्या प्रतिसादाकडे आपल्याकडे नसलेल्या वेळे मुळेही दुर्लक्ष करतात. काही वेळा हे सेक्सबॉट्स एखाद्या महिलेचे फोटो लोकांना पाठवतात. यात काही कार्टून असलेले संदेशही असतात आणि लोक त्यांच्या जाळ्यात अडकायला सुरवात होते.
काही संदेशांमध्ये एक फिशिंग लिंक असते. वापरकर्त्याने या फिशिंग लिंकवर क्लिक करताच. ते त्याच्याकडून वैयक्तिक तपशील विचारू लागतात. अशा वापरकर्त्याला अडकवून ते त्याच्यासोबत पुढिल नकोते प्रकार करतात आणि तुमचा सगळा तपशिल त्यांनी मिळवला आणि तुम्ही अडकला आहात याची खात्री झाली की ते मग खंडणी मागणी करायला लागतात. जर तुम्हाला सेक्सबॉट्स टाळायचे असतील तर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट खाजगी ठेवू शकता. तसेच सतर्क राहुन या प्रकारातील धोके टाळू शकता.
महाराष्ट्रात अनेक भागात विशेषत: मुंबई पुण्या सारख्या भागात सेक्सटॉर्शनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यात धक्कादायक प्रकार म्हणजे अनेकजण या प्रकाराची तक्रार करत नाहीत. तर अनेक जन समाजात बदनामी नको म्हणुन काही पैसे देऊन आपला ससेमिरा टाळायचा प्रयत्न करतात. पण त्या नंतरही हा प्रकार सुरुच राहतो यातुनच मग दुसरा कोणताही मार्ग न सापडल्याने फसलेले लोक आत्महत्येसारख्या प्रकाराला जवळ करतात पुण्यात असे प्रकार नुकतेच उघडकीस आले आहेत.
हेही वाचा : New Social Media Guidlines: सोशल मीडियावर प्रचार-प्रसार करताय? सावधान! केंद्र सरकारने आणले नवीन नियम