ETV Bharat / state

Metro Railway Timing Increased: खुशखबर! अंधेरी ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो आता रात्री 11:30 वाजेपर्यंन्त

author img

By

Published : Feb 13, 2023, 11:02 PM IST

मुंबई मेट्रोचे कामकाजाचे तास वाढवले आहेत. व्हॅलेंटाईन डे पासून शेवटची मेट्रोसेवा 10 वाजून 9 मिनिट ऐवजी आता रात्री उशिरा 11 वाजून 30 मिनिटांनी धावणार आहे. त्यामुळे महामुंबई मेट्रोने मेट्रो लाइन 2A आणि 7 वरील प्रवाश्यांना याचा फायदा होईल. अर्थात पाहिले दोन महिने प्रायोगिकरित्या उशिरापर्यंत मेट्रो धावणार.

Metro Railway Timing Increased
मेट्रो रेल्वे

मुंबई: अंधेरी बोरिवली कांदिवली तसेच गुंदवली ह्या भागात औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो. विशेष करून सेकंड शिफ्ट करणाऱ्या नागरिकांसाठी ही सोय तसेच कोचिंग क्लास करणारे किंवा मध्य रेल्वेकडून कामावरून घरी परतणारे अशा नागरिकांना आता ह्या शेवटच्या मेट्रोमुळे घरी लवकर पोहोचता येईल. तसे तर मेट्रोद्वारे प्रवास करणाऱ्या जनतेने रात्री लोकल रेल्वे प्रमाणे 2 वाजेपर्यन्त मेट्रो असावी अशी इच्छा व्यक्त केलीच होती.परंतु सुरुवात आहे त्यामुळे हळू हळू वेळा वाढवण्यात येईल असे दिसते. ह्या जनतेच्या अडचणी बाबत एमएमआरडीएने बरोबर हेरलं की रात्री पश्चिम उपगर ते पूर्व ते मध्य रेल्वे आणि मध्य रेलवे मार्ग ते पश्चिम असा प्रवास करणारे लाखो लोकं आहेत. त्या दृष्टीने आता रात्री 11: वाजे पर्यन्त शेवटची ट्रेन धावणार असल्याने टॅक्सी मिळत नाही बस मिळत नाही. तेव्हा मेट्रोचा आधार आवश्यकच होता.

अतिरिक्त मेट्रो सेवा पुढीलप्रमाणे: पुढील अतिरिक्त मेट्रो सेवा 14 फेब्रुवारी 2023 पासून प्रारंभी दोन महिन्यांसाठी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व 10 वाजून 20 मिनिट आणि 11:30 वाजता (दोन सेवा) तर गुंदवली ते डहाणूकरवाडी मार्गे दहिसर पूर्व रात्री 10 वाजून 20 मिनिटे आणि साडे 11 वाजे पर्यंत दोन सेवा चालवल्या जातील.

शेवटच्या गाड्यांचे तपशील: मेट्रो 2 अ आणि 7 ह्या मार्गावरील फेज-2 कार्यान्वित झाल्यानंतर सेवांची संख्या अधिक वाढेल आणि प्रकल्प ठरवलेली लाईनच्या लांबीपर्यंत मेट्रो मार्गाची वाढ झाली आहे. विविध शेवटच्या मेट्रो स्थानकासाठी शेवटच्या गाड्यांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
1) गुंदवलीहून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची ट्रेन रात्रीची 21:30 वाजता सुटेल
2) गुंदवलीहून डहाणूकरवाडीसाठी शेवटची रात्रीची ट्रेन – 22:30 वाजता सुटणार
3) गुंदवलीसाठी अंधेरी पश्चिमेकडून शेवटची रात्रीची ट्रेन – 21:30 वाजता धावणार
4) अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेसाठी शेवटची ट्रेन – 22:30 वावाजता धावणार
दहिसर पूर्वेकडून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची रात्रीची ट्रेन 10 वाजून 3 मिनिट पर्यंत धावेल.

हेही वाचा: Hearing On Shiv Sena: शिवसेना कुणाची? राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टात सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.