ETV Bharat / state

नागपुरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित ॲग्रोटेक केंद्र उभारणार; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित पहिल्यांदाच अ‌ॅग्रोटेक उभारण्यात येणार आहे. हे ॲग्रोटेक केंद्र सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर उभारले जाणार आहे. येथे कृषी आणि फळ प्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे.

Energy Minister Dr. Meeting between Nitin Raut and Tata officials
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि टाटाच्या अधिकाऱ्यांमधील बैठक.
author img

By

Published : Sep 17, 2020, 10:53 PM IST

मुंबई - शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित पहिल्यांदाच ॲग्रोटेक केंद्र उभारण्यासाठी बुधवारी मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

नागपूर जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठ्याच्या साखळीला अधिक चालना देण्याबरोबरच ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा अत्याधुनिक कृषी केंद्राची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करुन हे ॲग्रोटेक सेंटर मध्यस्थीचे काम करेल, असे मत डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

हे केंद्र उभारण्याच्यादृष्टीने नागपूर परिसराचा आणि राज्याच्या कृषी क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. हे ॲग्रोटेक केंद्र सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर उभारले जाणार आहे. येथे कृषी आणि फळ प्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे.

नागपूर आणि परिसराच्या कृषी क्षेत्रातील विशेष शेतमाल ज्या बाजारपेठेत मिळत नाही त्याठिकाणी हा कृषी माल विकण्यासाठी हे केंद्र चालना देईल. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन एकाच छताखाली सर्व माहिती आणि मदत या केंद्रामार्फत करण्यात येईल, अशी माहिती टाटा टेक्नोलॉजीचे संचालक सुशिल कुमार यांनी दिली. या बैठकीला हर्षवर्धन गुणे आणि अरुण खोब्रागडे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.