ETV Bharat / state

गणेशोत्सव काळात मध्य रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या धावणार

कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव काळातील प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल १६६ विशेष मेल, एक्सप्रेस चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत या गाड्या धावणार आहेत.

गणेशोत्सव काळात मध्य रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या धावणार
author img

By

Published : May 18, 2019, 10:39 AM IST

मुंबई - कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव काळातील प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल १६६ विशेष मेल, एक्सप्रेस चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत या गाड्या धावणार आहेत.

मुंबई ते सावंतवाडी दरम्यान २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत २६ फेऱ्या चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०१००१ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेस मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस सावंतवाडीला दुपारी २ वाजून १० मिनिटाला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१००२ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सावंतवाडीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१००७ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेसच्या १२ फेऱ्या चालविण्यात येतील. २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी ती रात्री १२.२० ला सुटेल. गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता सुटेल.

गाडी क्रमांक ०१०३३ मुंबई-रत्नागिरी-पनवेल २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत ३२ फेऱ्या चालविण्यात येतील. ती सीएसएमटीहून सकाळी ११.३० वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक ०१०३४ रत्नागिरीहून रात्री १०.५० वाजता सुटेल. याचप्रमाणे पनवेल-सावंतवाडी-मुंबई २२ फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेडणे ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल ८ फेऱ्या, पनवेल-सावंतवाडी ८ फेऱ्या, पनवेल-थिवीम आणि पुणे-रत्नागिरी ६ फेऱ्या (व्हाया कर्जत-पनवेल) तसेच पुणे-करमळी २ फेऱ्या चालविण्यात येतील.

Intro:कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव काळातील प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल 166 विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत या गाड्या धावतील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत 26 फेऱ्या चालविण्यात येतील. Body:गाडी क्रमांक 01001 मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेस मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस सावंतवाडीला दुपारी 2 वाजून 10 मिनिटांला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01002 सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी 3 वाजता सावंतवाडीहून सुटेल. गाडी क्रमांक 01007 मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेसच्या 12 फेऱ्या चालविण्यात येतील. 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी ती रात्री 12 .20 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 01008 सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस दुपारी 3 वाजता सुटेल.Conclusion:गाडी क्रमांक 01033 मुंबई-रत्नागिरी-पनवेल 28 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत 32 फेऱ्या चालविण्यात येतील. ती सीएसएमटीहून सकाळी 11.30 वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक 01034 रत्नागिरीहून रात्री 10.50 वाजता सुटेल. याचप्रमाणे, पनवेल-सावंतवाडी-मुंबई 22 फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेडणे 6 फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप 6 फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल 8 फेऱ्या, पनवेल-सावंतवाडी 8 फेऱ्या पनवेल-थिवीम पुणे-रत्नागिरी 6 फेऱ्या (व्हाया कर्जत-पनवेल), पुणे-करमळी 2 फेऱ्या चालविण्यात येतील.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.