मुंबई - बारावीच्य परिक्षेचा निकाल आजा जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल. फेब्रुवारी - मार्च महिन्यात बारावीची परिक्षा घेण्यात आली होती.
यावर्षी तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. सर्व विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. गेल्यावर्षी ३० मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. यात ८८.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यात मुलींचे प्रमाण ९२.३६ टक्के तर मुलांचे प्रमाण ८५.२३ टक्के इतके होते.
निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी २९ मे ते ७ जून या कालावधीत करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जूनपर्यंत अर्ज करता येईल
या संकेतस्थळावर पाहू शकता निकाल-
- www.mahresult.nic.in
- www.hscresult.mkcl.org
- www.maharashtraeducation.com