ETV Bharat / state

ओबीसीच्या वाट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध; उदगीर- नळेगाव मार्गावर रास्तारोको आंदोलन

author img

By

Published : Dec 5, 2020, 8:05 PM IST

Updated : Dec 5, 2020, 8:11 PM IST

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चर्चेत असताना दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. मराठा समाजाला आरक्षण आवश्यक आहे. पण आमच्यात हिस्सेकरी होऊ नये, अशी भूमिका घेत ओबीसी समाज रस्त्यावर उतरला. ओबीसी समाजचे आरक्षण कायम राहावे यासाठी आज शुक्रवारी जिल्ह्यातील उदगीर- नळेगाव मार्गावर रास्तारोको करण्यात आला.

ओबीसींचे रास्तारोको आंदोलन
ओबीसींचे रास्तारोको आंदोलन

लातूर - मराठा समाजाला आरक्षण देताने ओबीसीच्या वाट्यातून देऊ नये, अशी मागणी करत ओबीसी समाजाने उदगीर- नळेगाव मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. राष्ट्रवादीचे मकरंद सावे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून राज्यातील मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापूर्वी आपले आरक्षण कायम ठेवण्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी उदगीर- नळेगाव मार्गावर रास्तारोको करण्यात आला.

हेही वाचा-ओबीसींचा अंत पाहू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू- प्रकाश शेंडगे यांचा निर्वाणीचा इशारा

...तर ओबीसींवर अन्याय होणार!

राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे म्हणाले, की ओबीसी समाजाला आरक्षण असले तरी समाजाच्या दृष्टीने ते कमी प्रमाणात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला समता परिषदेचा विरोध नाही. तसेच ओबीसी समाजाचाही मराठा आरक्षणाला विरोध नाही. यापूर्वी मराठा- मुस्लिम मोर्चाच्या दरम्यान, ओबीसी समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा दिलेला आहे. पण जर ओबीसीमध्ये आरक्षण दिले जाणार असेल तर त्याला विरोध हा कायम राहणार आहे. समता परिषदेच्या बैठकीत मंत्री छगन बुजबळ हेदेखील मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणीसाठी आग्रही आहेत. पण ओबीसींमध्ये हा समाज वाटेकरी झाला तर ओबीसींवर अन्याय होणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे मकरंद सावे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-मराठा आरक्षण: स्थिगिती हटविण्याच्या सरकारच्या अर्जावर ९ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा-
लातूर जिल्ह्यातील उदगीर- नळेगाव या मार्गावर शुक्रवारी दुपारी रास्तारोको करण्यात आला. दरम्यान, ओबीसी समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरी रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

दरम्यान, सध्या मराठा समाजाच्या आरक्षणावरून मंत्रिमंडळात बैठका पार पडत आहेत. त्यामुळे मराठा समाज आपल्याच आरक्षणातील हिस्सेदार होईल, अशी ओबीसी समाजाला चिंता आहे.

धनगर समाजानेही दिला इशारा-

राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही इतर समाजाच्या नेत्यांनी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्नही करू नये. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी नुकतेच मुंबईत दिला आहे.

Last Updated : Dec 5, 2020, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.