ETV Bharat / state

'मोदी'ही आहेत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत...!

गुरुलिंग मोदी यांचे मूळ गाव लातूर तालुक्यातील भिसे वाघोली हे आहे. २० वर्षांपूर्वी त्यांनी विहीर खोदण्यासाठी आणि पाईपलाईन करण्यासाठी एसबीआय व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मिळून २ लाखांचे कर्ज काढले होते. मात्र, त्यांना ना आघाडीच्या काळात ना युतीच्या काळात कर्जमाफी मिळाली नाही.

गुरुलिंग मोदी, शेतकरी
author img

By

Published : Apr 17, 2019, 4:47 PM IST

लातूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा रक्कम आणि पेन्शनसारखे मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कर्जमाफी फसवी असल्याचे विरोधकांनी पटवून दिले, तर सत्ताधाऱ्यांनी आपल्या यशाचा धिंडोरा पिटला. मात्र, मोदी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, हो हे खरे आहे. लातुरतील गुरुलिंग मोदी गेल्या २० वर्षांपासून कर्जमाफीची प्रतिक्षा करत आहेत.

आपली व्यथा सांगताना शेतकरी गुरुलिंग मोदी

गुरुलिंग मोदी यांचे मूळ गाव लातूर तालुक्यातील भिसे वाघोली हे आहे. त्यांच्याकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती आहे. २० वर्षांपूर्वी त्यांनी विहीर खोदण्यासाठी आणि पाईपलाईन करण्यासाठी एसबीआय व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मिळून २ लाखांचे कर्ज काढले होते. कर्ज काढून आता २० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, त्यांना ना आघाडीच्या काळात ना युतीच्या काळात कर्जमाफी मिळाली नाही. याउलट वेळेत कर्जाची परतफेड केली नसल्याने बँकेने त्यांना न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे गुरुलिंग मोदी यांना आता बँकेबरोबरच न्यायालयाचीही पायरी चढावी लागत आहे.

कर्जाचा डोंगर घेऊनच त्यांनी ३ मुलींची लग्न केली आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. वयाच्या ५२ व्या वर्षी काढलेले कर्ज अद्यापही माफ झाले नाही. त्यामुळे वयाच्या ७२ व्या वर्षीही गुरुलिंग मोदी हे या कर्जाच्या विवंचनेतच आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांसाठी एक ना अनेक आश्वासनांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, गुरुलिंग मोदीं सारख्या शेतकऱ्यांच्या समस्या आजही कायम आहेत.

Intro:'मोदी' ही आहेत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत..!
लातूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा रक्कम आणि भविष्यात पेन्शन यासारखे मुद्दे मोठया प्रमाणात चर्चिले गेले. विरोधकांनी कर्जमाफी कशी फसवी आहे पटवून दिले तर सत्ताधार्यांनी आपल्या यशाचा धिंदोरा पिटला. मात्र, मोदीही अजून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. हो हे खरे आहे पण या कर्जमाफीची प्रतीक्षा लागली आहे लातूरतील गुरुलिंग मोदी यांना. गेल्या 20 वर्षापासून गुरुलिंग मोदी यांना कर्जमाफीबाबत आश्वासने मिळाली आहेत. प्रत्यक्षात दिवसेंदिवस या कर्जाचा डोंगर वाढत आहे.

Body:गुरुलिंग मोदी यांचे मूळ गाव लातूर तालुक्यातील भिसे वाघोली. त्यांना साडे चार एक्कर कोरडवाहू शेती असून 20 वर्षांपूर्वी त्यांनी विहीर खोदण्यासाठी आणि पाईपलाईन करण्यासाठी एसबीआय व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मिळून 2 लाखाचे कर्ज काढले होते. कर्ज काढून आता 20 वर्षाचा कालावधी लोटला तरी त्यांना ना आघाडीच्या काळात ना युतीच्या काळात कर्जमाफी झाली. उलतार्थी वेळेत कर्जाची परतफेड केली नसल्याने बँकेने त्यांना कोर्टात खेचले आहे. त्यामुळे गुरुलिंग मोदी यांना आता बँकेबरोबरच कोर्टाचीही पायरी चढावी लागत आहे. हा कर्जाचा डोंगर घेऊनच त्यांनी तीन मुलींची लग्न केली आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. वयाच्या 52 व्या वर्षी काढलेले कर्ज अद्यापही माफ न झाल्याने 72 वर्षीय गुरुलिंग मोदी हे या कर्जाच्या विवंचनेतच असतात.

Conclusion:यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना घेऊन एक ना अनेक आश्वासनांच्या घोषणा करण्यात आल्या. मग त्या विरोधकांनी असो की सत्ताधाऱ्यांनी मात्र, गुरुलिंग मोदीं सारख्या शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.