कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. यामुळे पुणे-बंगळुरू मार्गावरील पाणी पातळीत वाढ वाढ झाली आहे. तर या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या नदीची पाणी पातळी आता ५२.६ वर पोहोचली आहे. तर राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या पुराच्या पाण्यातही वाढ झाली आहे. यामुळे पुण्याहून कोल्हापूर-बेळगावमार्गे बंगळुरूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १०९ बंधारे पाण्याखाली गेली आहेत.
या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्याची पूर्ण स्थिती अजूनच गंभीर झाली आहे. तर १९८९ आणि २००५ पेक्षाही मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.