कोल्हापूर - राज्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले आहेत. अनेक गावात सध्या रक्तदान शिबिराला आता मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातल्या सैनिक गिरगाव गावामध्येसुद्धा आज सकाळपासुनच रक्तदानासाठी नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 'सोशल डिस्टन्स' ठेवून नागरिक रक्तदान करत आहेत.
यामध्ये महिलांचाही विशेष सहभाग दिसून येत आहे. सैनिक परंपरा असलेल्या गावातील तरुण एकीकडे सीमेवर लढत आहेत. तर, गावातील नागरिक आता रक्तदानाच्या माध्यमातून देशासाठी पुढे आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमात हे संपूर्ण शिबीर पार पडत आहे. त्यामुळे या गावकऱ्यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.