ETV Bharat / state

दुसऱ्या कोरोना लाटेची शक्यता, जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू

दिवसाला तेराशे ते चौदाशे रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली जात असून व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन खाटा उपलब्ध करण्यासह खासगी रुग्णालयांशी आरोग्य विभागाचा संपर्क सुरू आहे. खबरदारी म्हणून उपाययोजना करत असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Nov 18, 2020, 8:10 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात दुसऱ्या कोरोना लाटेची शक्यता वर्तवली जात असून जिल्हा परिषदेकडून नियोजन सुरू आहे. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये दुसरी लाट येऊ शकते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अतिरिक्त खाटांचे नियोजन सुरू झाले आहे. दिवसाला तेराशे ते चौदाशे रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली जात असून व्हेंटिलेटर,ऑक्‍सिजन खाटा उपलब्ध करण्यासह खासगी रुग्णालयांशी आरोग्य विभागाचा संपर्क सुरू आहे. खबरदारी म्हणून उपाययोजना करत असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली.

माहिती देताना अधिकारी
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने नियोजनास सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच खासगी रुग्णालयांशी संपर्क सुरू केला आहे. मागील आठ महिन्यात एका दिवसात जी उच्चांकी रुग्णसंख्या झाली होती, त्यामध्ये १० टक्‍के वाढ करून खाटांचे नियोजन लावले जात आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकाच दिवसात १२०० रुग्ण सापडले होते. आता साधारणपणे १३०० ते १४०० रुग्ण गृहीत धरून खाट, प्राणवायू, व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असतानाच जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विविध सण-उत्सवांमुळे आता रस्त्यावर व बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीत बरेच लोक कोरोनाच्या सूचनांचे पालन करत नसल्याने पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. राजधानी दिल्लीचा अनुभव विचारात घेऊन जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात उच्चांकी रुग्ण दाखल होण्याचे गृहीत धरून तयारी सुरू झाली आहे. एका दिवसात १३०० ते १४०० रुग्ण दाखल झाले तर यातील ४० टक्‍के रुग्णांवर घरीच उपचार केले जाणार आहेत. ४५ टक्‍के रुग्ण हे कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहेत. तर १२ टक्‍के लोकांना प्राणवायू तर ३ टक्‍के लोकांना व्हेंटिलेटर लागण्याची शक्‍यता गृहीत धरून ही तयारी सुरू करण्यात आली आहे.

सध्या 600 रुग्णांवर उपचार

नोव्हेंबर अखेर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत पन्नास हजारांपर्यंत पोचली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. सध्या सहाशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर राज्य शासनाने दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून दक्षता घेत आहे.

कोरोना मंत्र जपा, मित्तल यांचा संदेश

कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल तर कोरोना मंत्र जपा आपल्याजवळ मार्क सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे बंधन ठेवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.