ETV Bharat / state

कोल्हापुरातील कन्हैय्या कुमारची सभा रद्द

पोलीस प्रशासनाने सभेला परवानगी नाकारल्याने सभा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांच्या दडपशाही धोरणामुळे सभा रद्द करत असल्याचा आरोप आयोजकांनी यावेळी केला.

कोल्हापुरातील कन्हैय्या कुमारची सभा रद्द
कोल्हापुरातील कन्हैय्या कुमारची सभा रद्द
author img

By

Published : Feb 20, 2021, 9:44 AM IST

कोल्हापूर : विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारची कोल्हापुरात होणारी सभा रद्द झाली आहे. सभेला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ही सभा रद्द करण्यात आली आहे.

पोलिसांवर दडपशाहीचा आरोप

गिरीश फोंडे यांनी याची माहिती दिली आहे. पोलीस प्रशासनाने सभेला परवानगी नाकारल्याने सभा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांच्या दडपशाही धोरणामुळे सभा रद्द करत असल्याचा आरोप आयोजकांनी यावेळी केला.

येत्या काही दिवसांत होणार सभा

पुढील काही दिवसांत याच वक्त्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात सभा घेऊ असे गिरीश फोंडे यांनी म्हटले आहे. याची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पानसरेंच्या स्मृती प्रित्यर्थ सभा

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोल्हापुरात स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभेला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.