कोल्हापूर - जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे गोकुळ दूध संघाने दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असल्याने त्याचबरोबर पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गोकुळमधून दररोज पुण्याला २ लाख ७० हजार लिटर दूध जाते. तर मुंबईला ७ लाख लिटर दूध जाते. या निर्णयामुळे पुणे आणि मुंबईला दूधाचा तुटवडा जाणवणार आहे. गोकुळचे पुण्याला जाणारे टँकर मंगळवारी रात्रीपासून अडकून पडले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांबरोबर गोकुळचेही नुकसान झाले आहे.