कोल्हापूर - राजघराण्यात पारंपरिक लवाजम्यासह शाही वातावरणात गणेश मूर्तीचे आगमन झाले. राणीसाहेब, संयोगिता राजे, मधुरिमा राजे यांनी विधीवत औक्षण करून बाप्पाचे स्वागत केले. यावेळी श्रीमंत शाहू महाराज, खासदार छत्रपती संभाजीराजे , छत्रपती मालोजीराजे आणि छत्रपती यशराजे उपस्थित होते.
यावेळी खासदार संभाजीराजेंनी सर्व लोकांनी एकत्र येऊन गणपती उत्सव आनंदाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची गेल्या 100 वर्षांपासून परंपरा आहे. शाहू महाराजांनंतर आम्ही देखील ही परंपरा जपली असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आगामी निवडणुकांबाबत सुद्धा संभाजीराजे यांनी गणरायाकडे साकडे घातले.