ETV Bharat / state

Missing Girl : कोल्हापुरात लवजिहाद प्रकार ? 18 दिवसांपासून मुलगी बेपत्ता आमदार नितेश राणे करणार आंदोलन

अठरा दिवसांपासून कोल्हापुरातून एक मुलगी बेपत्ता ( girl is missing from Kolhapur ) आहे. याप्रकरणी या मुलीसोबत लवजिहाद सारखा प्रकार घडला आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) देखील मध्यस्थी करत असून उद्या नितेश राणे कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहेत.

Old Rajwada Police Station
जुना राजवाडा पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 2, 2022, 10:49 AM IST

कोल्हापूर : गेल्या अठरा दिवसापासून कोल्हापुरातून एक मुलगी बेपत्ता ( girl is missing from Kolhapur ) आहे. याप्रकरणी या मुलीसोबत लवजिहाद सारखा प्रकार घडला आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. सदरची मुलगी ही अल्पवयीन आहे. याबाबतची तक्रार मुलीच्या पालकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र 18 दिवस उलटूनही अद्याप कोणतेच कारवाई झालेले नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी जुना राजवाडा पोलिसांना ( Old Palace Police ) याबाबत जाब विचारला आहे. तसेच याप्रकरणी आता आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) देखील मध्यस्थी करत असून उद्या नितेश राणे कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहेत.

जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : कोल्हापुरात लवजिहाद सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संबंधित मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना अठरा दिवसापूर्वी घडली असल्याचे समोर आले आहे. शिवाय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील पोलीस कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी जुना राजवाडा पोलिसांना याबाबत जाब विचारला आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी दोन दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे.

मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात : आम्हाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रत सर्व ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. तर या प्रकरणात आता आमदार नितेश राणे देखील मध्यस्थी करणार असून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला जावा यासाठी उद्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ते आंदोलन करणार आहेत. तर या प्रकरणातील मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रकरण नाजूक असल्याने पोलिस काळजीपूर्वक तपास करत आहेत. प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.