जालना - येथे आयोजित करण्यात येत असलेल्या विविध संगीत महोत्सवांमध्ये पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव २०२० ने भर घातली आहे. संस्कृती मंच जालना आणि कलाश्री संगीत मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५-१६ फेब्रुवारी दरम्यान पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव २०२० आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक कुमार देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात डॉ. जयश्री प्रभू यांनी बिहाग व पहाडी धून सादर केली. त्यांना संकेत शार्दूल यांनी तबल्यावर साथ दिली. दीपक भानुसे पुणे यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग यमन आणि पहाडी धून सादर केली आणि पं. सुधाकर चव्हाण पुणे यांनी राग गोरख कल्याण सादर केला.
हेही वाचा - कुंडलिका नदीसह सीना नदीच्या स्वच्छता मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात
या संगीत महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद दाभाडकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात अंकिता चव्हाण हिने गायलेल्या गणेश वंदनाने झाली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, साहित्यिक रेखा बैजल, अॅड. सुनील किनगावकर, डॉ. सुधीर जाधव आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
हेही वाचा - आरोग्य मंत्र्यांच्या शहरातील महिला रुग्णालयातच नाही सोनोग्राफी मशीन, गरोदर महिला त्रस्त