ETV Bharat / state

Nupur Sharma Row : जालना, भोकरदनमध्ये नुपूर शर्मांविरोधात मुस्लिम समाजाची निदर्शने

author img

By

Published : Jun 10, 2022, 8:26 PM IST

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जालन्यात देखील मुस्लिम समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात ( muslim community protest against Nupur Sharma in Jalna )आली.

jalna muslim community protest
jalna muslim community protest

जालना - भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर देशभर मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त करण्यात येतं आहे. जालन्यात देखील या घटनेचे पडसाद उमटले आहे. जालना शहरासह भोकरदनमध्ये हजारो मुस्लिम नागिरक नुपूर शर्मांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. यावेळी जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात ( muslim community protest against Nupur Sharma in Jalna ) आली.

जालन्यात नुपूर शर्मांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी अचानक हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर आले. जुना जालना परिसरातील उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठा जमाव पाहायला मिळाला. यावेळी मुस्लिम जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून, घटनास्थली मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

मुस्लिम समाजाकडून जालन्यात करण्यात आली निदर्शने

राष्ट्रपतींना निवेदन - तर, भोकरदन शहरात ही मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. नुपूर शर्मांविरोधात कठोकर कारवाई करण्याची मागणीचे निवेदनही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले.

अचानक मुस्लिम समाज रस्त्यावर - जालना शहरात आज ( 10 जून ) सोशल मीडियाच्या माध्यमातून बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मुस्लिम संघटनांच्या वतीने कुठलाही बंद पाळला जाणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, हजारोंच्या संख्येने अचानक रस्त्यावर मुस्लिम समाज जमा झाल्याने प्रशासनाची ही धांदल उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपअधिक्षक विक्रांत देशमुख यांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा - Solapur MIM Morcha : नुपूर शर्मांविरोधात काढलेल्या मोर्चात हुल्लडबाजी; पोलिसांनी केला सौम्य लाठीमार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.