ETV Bharat / state

भाजप कार्यकर्त्यांकडून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना काळे झेंडे दाखवून निषेध - Power substation case Rajesh Tope black flag

परतूर विधानसभा मतदारसंघात प्रस्तावित असलेले वीज उपकेंद्र जालना तालुक्यातील उटवद येथे स्थलांतरित करण्यात आले. या स्थलांतराला विरोध असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य मंत्री तथा जालनाचे पालकमंत्री राजेश टोपे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

Power substation case Rajesh Tope black flag
राजेश टोपे ताफा काळे झेंडे
author img

By

Published : Jun 12, 2021, 9:41 PM IST

जालना - परतूर विधानसभा मतदारसंघात प्रस्तावित असलेले वीज उपकेंद्र जालना तालुक्यातील उटवद येथे स्थलांतरित करण्यात आले. या स्थलांतराला विरोध असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य मंत्री तथा जालनाचे पालकमंत्री राजेश टोपे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

मंत्री राजेश टोपे यांना काळे झेंडे दाखवताना भाजपचे कार्यकर्ते

हेही वाचा - महात्मा फुले जनआरोग्य योजना : शासननिर्देशित रुग्णालयात उपचार केले तर भरपाई मिळणार

परतूर विधानसभा मतदारसंघात असलेल्या नेर शेवली या भागामध्ये युती सरकारच्या काळात वीज उपकेंद्राचे भूमिपूजन तत्कालीन राज्याचे पाणीपुरवठा तथा जालनाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले होते. मात्र, तेच उपकेंद्र आता जालना तालुक्यातील उटवद येथे स्थलांतरित करण्यात आले आणि त्याचे भूमिपूजन ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाला जाताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याचा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केला आणि घोषणाबाजी करून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा निषेधही केला.

निषेध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये माऊली शेजुळ, प्रकाश टकले, विक्रम उफाड, विनोद राठोड आदींचा समावेश होता.

हेही वाचा - बदनापूमध्ये पाझर तलावात बुडून तीन बालकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.