ETV Bharat / state

लस कधी येईल माहित नाही, पूर्व तयारी सुरू - राजेश टोपे - जालना जिल्हाधिकारी बातमी

चार लाख 47 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. या सर्वेक्षणात दरम्यान विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या समावेश आहे. यामध्ये सारी 1027, सर्दी ताप खोकला सहा हजार 781, covid-19 448 आणि इतर अन्य आजार म्हणजेच मधुमेह हृदयरोग दमा अशा प्रकारची 39 हजार 293 रुग्ण आढळून आले आहेत. ही सर्व यंत्रणा राबविण्यासाठी 983 पथके स्थापन करण्यात आले असून 2949 कर्मचारी ज्यामध्ये हे अशा अंगणवाडी मदतनीस स्वयंसेवक आणि 46 डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे.

do not know when the vaccine will come but start pre preparation say rajesh tope in jalna
लस कधी येईल माहित नाही, पूर्व तयारी सुरू
author img

By

Published : Oct 12, 2020, 5:00 PM IST

Updated : Oct 12, 2020, 6:49 PM IST

जालना - Covid-19 वर लस कधी येईल ते माहीत नाही. मात्र, जेव्हा केव्हा ही लस येईल तेव्हा या लसीचा उपयोग ज्यांच्यावर करायचा आहे हे त्या सर्व रुग्णांची माहिती माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून जमा केली जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून दमा, हृदय रोग, मधुमेह, रक्तदाब, अशा विविध प्रकारच्या आजाराचे वर्गीकरण केले जात आहे. त्यामुळे लस आल्यानंतर याचा वापर कोणत्या प्रकारातील रुग्णांना अत्यावश्यक आहे हे ठरवले जाईल. याचीच ही पूर्वतयारी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लस कधी येईल माहित नाही, पूर्व तयारी सुरू

या मोहिमेविषयी अधिक माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण चार लाख 91 हजार 497 कुटुंबांपैकी चार लक्ष 47000 कुटुंबाचे सर्वेक्षण झाले झाले आहे. या सर्वे दरम्यान covid-19 तिच्या रुग्णांपेक्षा सारी आणि सर्दी ताप, खोकल्याचे, रुग्ण जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना सारी हा आजार आहे त्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती ती आरोग्य यंत्रणेने दिली.

जालना जिल्ह्यामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी याविषयीच्या सर्व्हेला दोन टप्प्यांमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक आठ ऑक्टोबरपर्यंत जालना जिल्ह्यातील बावीस लक्ष अकरा हजार लोकसंख्येसाठी 4 लाख 91 हजार एवढी कुटुंब संख्या आहे. आतापर्यंत चार लाख 47 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. या सर्वेक्षणात दरम्यान विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या समावेश आहे. यामध्ये सारी 1027, सर्दी ताप खोकला सहा हजार 781, covid-19 448 आणि इतर अन्य आजार म्हणजेच मधुमेह हृदयरोग दमा अशा प्रकारची 39 हजार 293 रुग्ण आढळून आले आहेत. ही सर्व यंत्रणा राबविण्यासाठी 983 पथके स्थापन करण्यात आले असून 2949 कर्मचारी ज्यामध्ये हे अशा अंगणवाडी मदतनीस स्वयंसेवक आणि 46 डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. त्यांच्या मदतीसाठी 43 रुग्णवाहिका ही कार्यरत आहेत. दरम्यान ज्या रुग्णांना सारी आजार आहे, अशा सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून त्यांना हा आजार कशामुळे झाला याची खात्री करण्यात येणार आहे.

448 नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या रुग्णांना रुग्णालयात भरती होण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करत आहे. मात्र काही रुग्ण खासगी रुग्णालयात जाण्यासाठी आग्रही असल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णालयात भरती झाल्यानंतरच त्यांचा अहवाल आरोग्य विभागाकडे येईल. दरम्यान ग्रामीण भागात काम करण्यासाठी आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना घरावर स्टिकर लावणे, टोपी टी शर्ट अशा प्रकारची शासनाकडून आलेली सर्व साहित्य वाटप करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा पहिला तर दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर 24 ऑक्टोबर या दहा दिवसांचा आहे. दरम्यान या दोन्ही टप्प्यांमध्ये जालना जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात असलेल्या एकूण बावीस लक्ष अकरा हजार 736 लोकसंख्या असलेल्या 4 लक्ष 91 हजार 497 कुटुंबाचे सर्वेक्षण होणार आहे.

Last Updated : Oct 12, 2020, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.