जालना - भोकरदन तालुक्यातील रजाळा येथील एका तरुणाने आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून गावातील जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट दिला आहे. अविनाश उर्फ विजय बोर्डे, असे या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - जालना जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता, भाजपला शह
आजकाल समाजामध्ये तरुण वाढदिवसाला ज्या पद्धतीने डीजे लावून, फटाके वाजवून वायफळ खर्च करतात. मात्र, विजयने हा वायफळ खर्च न करता शाळेला संगणक भेट दिला आहे. त्याच्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे.