ETV Bharat / state

टेम्पो-दुचाकीचा अपघात, एकाच कुटुंबातील तीन जण ठार

author img

By

Published : Oct 14, 2020, 4:08 PM IST

मालवाहू टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना जळगावमध्ये घडलीये. हा अपघात औरंगाबाद जळगाव महामार्गावर घडला. मालवाहू टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Jalgaon_accident
टेम्पो-दुचाकीचा अपघात

जळगाव - मालवाहू टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना जळगावमध्ये घडलीये. हा अपघात औरंगाबाद जळगाव महामार्गावर घडला. मालवाहू टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातात ठार झालेल्यांमध्ये दाम्पत्याचा समावेश होता. पती पत्नी आणि आणखी एक जण असे ट्रिपल सीट दुचाकीवरून जात होते. त्यावेळी टेम्पोची दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर तीसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पती श्यामलाल शहादूलाल केवट, पत्नी नेवस्वा श्यामलाल केवट आणि दीपक शहादूलाल केवट अशी मृतांची नावं आहेत.

मृत श्यामलाल हे बेकरीचे उत्कृष्ट कारागीर होते. आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मुलांचे शिक्षण तसेच मुलीच्या लग्नासाठी पैश्यांची जमवाजमव करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, म्हणून पती-पत्नी मिळेल ते काम करत होते. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने केवट दाम्पत्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.