ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात मतमोजणीची तयारी पूर्ण; उद्या सकाळी 10 वाजतापासून मतमोजणी

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केल्यानंतर उद्या निकाल जाहीर होणार आहे. निकालाबाबत सर्वच ग्रामपंचायतीत कमालीची उत्सुकता आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून सकाळी दहापासून मतमोजणी सुरू होईल.

vote counting Jalgaon news
मतमोजणी तयारी जळगाव बातमी
author img

By

Published : Jan 17, 2021, 7:29 PM IST

जळगाव - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केल्यानंतर उद्या निकाल जाहीर होणार आहे. निकालाबाबत सर्वच ग्रामपंचायतीत कमालीची उत्सुकता आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून सकाळी दहापासून मतमोजणी सुरू होईल.

माहिती देताना जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील

हेही वाचा - जळगावात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, नागरिकांचा रस्तारोको

जिल्ह्यात १५ जानेवारीला ७८३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे ६७८ ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यात ७८.११ टक्के मतदान झाले होते. सर्वत्रच अतिशय चुरशीच्या लढती झाल्या आहेत. २ हजार ४१५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यात ६७८ ग्रामपंचायतींसाठी एकूण १३ लाख ११ हजार ८४७ मतदार होते. त्यापैकी १० लाख २४ हजार ६८३ मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुषांची संख्या ५ लाख ३८ हजार ५९५, तर महिलांची संख्या ही ४ लाख ८६ हजार ५४ इतकी होती. एकूण ७८.११ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जामनेर तालुक्यात ८२.४५ टक्के, तर सर्वात कमी मतदान भुसावळ तालुक्यात ६७.९६ टक्के झाले.

मतमोजणीचे प्रथम प्रात्‍यक्षिक

जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात काही ठिकाणी तहसील कार्यालयात मतमोजणी केंद्र आहेत. तर इतर ठिकाणी देखील मतमोजणी केंद्र आहेत. सर्वच ठिकाणी आज तहसीलदारांनी मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मतमोजणीबाबत मार्गदर्शन केले.

पहिला निकाल शिरसोलीचा

जळगाव तालुक्याची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी एकूण दहा टेबलावर मतमोजणी होणार आहे. एकावेळी दहा टेबलावर मतमोजणी होईल. एका टेबलावर तीन कर्मचारी असतील. त्यावर पर्यवेक्षक असेल. एकावेळी सर्व टेबलावर एकाच ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. एकूण १८ फेऱ्यात मतमोजणी होईल. सुरवातीस शिरसोली प्रबो, शिरसोली प्रन, म्हसावद, आवार, तुरखेडा, नांद्रा खु, खापरखेडा, असोदा, ममुराबाद, कानळदा या ग्रामपंचायतींची मतमोजणी हेाईल.

हेही वाचा - जळगावचे उद्योजक सर्वेश मणियार यांची आफ्रिकेत हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.