ETV Bharat / state

जळगावात पेट्रोलचे दर शंभरीकडे; पेट्रोल ९४.०० रुपये तर डिझेल ८३.२० रुपये प्रतिलिटर

author img

By

Published : Jan 27, 2021, 3:42 PM IST

Updated : Jan 27, 2021, 3:53 PM IST

जळगाव शहरात पेट्रोलचे दर शंभरीकडे गेले आहेत. शहरात पेट्रोल 94.00 रुपये तर डिझेल 83.20 रुपये प्रतिलिटर आहे.

petrol is priced at Rs 94.00 and diesel at Rs 83.20 per liter, In Jalgaon
जळगावात पेट्रोलचे दर शंभरीकडे; पेट्रोल ९४.०० रुपये तर डिझेल ८३.२० रुपये प्रतिलिटर

जळगाव - शहरात बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बुधवारी जळगावात पेट्रोलचे दर ९४.०० रुपये तर डिझेल ८३.२० रुपये प्रतिलिटर आहेत.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी -

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक बाबी आहेत. त्यांचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी वाढ -

अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने महागाईत भर पडत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जळगावात गेल्या आठ दिवसात पेट्रोलचे दर दीड ते दोन रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोलच्या दराने नव्वदीच्या टप्पा ओलांडून शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

डिझेलचे दरही वाढतेच -

डिझेलचेही दर सातत्याने वाढतच आहेत. पेट्रोल शंभराच्या तर डिझेल नव्वदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ होते. त्यामुळे महागाईचा आलेख वाढत जातो. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी जगायचे तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता वाहने परवडत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

Last Updated : Jan 27, 2021, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.