ETV Bharat / state

गावठी कट्टे बाळगणाऱ्या एकास अटक; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सैय्यद कलीम याच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या 2 गावठी कट्ट्यांची किंमत 40 हजार रुपये आहे. हे कट्टे तो परमिट शिवाय बाळगत होता. यासंदर्भातील माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली होती. पोलिसांनी नाहटा चौफुली परिसरात सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.

गावठी कट्टे
गावठी कट्टे
author img

By

Published : Mar 4, 2020, 3:42 AM IST

जळगाव - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ गावठी कट्टे बाळगणाऱ्या एकास अटक केली आहे. भुसावळ शहरातील नाहटा चौफुली परिसरात मंगळवारी दुपारी ही कारवाई झाली. सैय्यद कलीम सैय्यद जावेद (वय 21, रा. मुस्लिम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची प्रतिक्रिया

सैय्यद कलीम याच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या 2 गावठी कट्ट्यांची किंमत 40 हजार रुपये आहे. हे कट्टे तो परमिट शिवाय बाळगत होता. यासंदर्भातील माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली होती. पोलिसांनी नाहटा चौफुली परिसरात सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शेख युनूस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद कलीम याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.