ETV Bharat / state

हिंगोलीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलाहातून टोकाचे पाऊल

हिंगोली जिल्ह्यातील कानडखेडा गावात एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी घडली.

Suicide
आत्महत्या
author img

By

Published : Nov 8, 2020, 7:29 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी कानडखेडा गावात घडली. पतीसोबत झालेल्या वादानंतर तिने विहीरीत उडी घेतल्याचे समोर आले आहे. अंकिता नितीन कांबळे (१९) असे मृताचे नाव आहे.

वर्षभरापूर्वी झाला होता प्रेमविवाह -
अंकिता आणि नितीन या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह लावून दिला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीन हा दारूच्या आहारी गेल्याने दोघांमध्ये वाद उद्भवत होते. हा वाद एवढा विकोपाला गेला की, अंकिताने स्वतःच्या शेतातील विहीर गाठून उडी घेतली आणि तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच, गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमनवार, कनेरगावचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, नांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात रवाना केला.

हेही वाचा - राज्याच्या 'या' कॅबिनेट मंत्र्याच्या वहिनीची गळफास घेत आत्महत्या; माहेरच्यांनी केले गंभीर आरोप

हेही वाचा - धक्कादायक! दहा महिन्यांत पश्चिम विदर्भातील 872 शेतकऱ्यांची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.