हिंगोली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. या संकटाचा सामाना करण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यात हिंगोली जिल्ह्यातूनही मदतीचा ओघ सुरू झाला आहे. एका बारा वर्षाच्या चिमुकल्याने मोठ्या आशेने सायकल घेण्यासाठी बचत केलेली रक्कम मोठ्या मनाने पंतप्रधान सहायता निधीत दिले आहेत. त्याबद्दल या चिमुकल्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
विशेष म्हणजे दिवसेंदिवस मदतीचा ओघ सुरू असल्याचे पाहून आरुष हा प्रभावित झाला होता. त्यांनी ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली. लागलीच आई-वडिलांनी त्याचे कौतुक करत त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले. आरुषने बचत करण्यासाठी बनवलेला गल्ला हा तहसीलदारांसमोर नेला आणि फोडला तर त्यामध्ये पाच हजार 600 रुपयांची जमा केलेली रक्कम निघाली. ही सर्व मदत कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत म्हणून दिली.
हेही वाचा - गरिबांना घास भरविण्यासाठी हिंगोली पोलीस प्रशासन मदतीला