ETV Bharat / state

हिंगोलीत पुन्हा रेशनचा काळाबाजार; पुरवठा विभागाने निलंबीत दुकानदाराला पाठवले धान्य

विविध तक्रारी अंतर्गत निलंबित केलेल्या रेशन दुकानदाराला शुक्रवारी रेशनचा पुरवठा करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात अजूनही काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. दुकानासमोर राजीनामा दिल्याचे फलक लावलेले असतांना या दुकानात रेशनचा माल आल्याने, सर्वांनाच श्चर्याचा धक्का बसलेला आहे.

नरसी नामदेव येथील रेशन दुकान
author img

By

Published : Jul 20, 2019, 11:42 AM IST

हिंगोली- राज्यात हिंगोली जिल्हा रेशनचा काळाबाजार करण्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. याला पुरवठा विभागच जबाबदार असल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा समोर आले आहे. विविध तक्रारी अंतर्गत निलंबित केलेल्या रेशन दुकानदाराला शुक्रवारी रेशनचा पुरवठा करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात अजूनही काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. दुकानासमोर राजीनामा दिल्याचे फलक लावलेले असताना या दुकानात रेशनचा माल आल्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नरसी नामदेव येथील रेशन दुकान
हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील बाहेती या रेशन दुकानदाराला धान्य घोटाळा, वेळेवर धान्य वाटप न करणे, तसेच एकाच महिन्यात दोन महिन्याचे धान्य उचलून त्याचा अपहार करणे इत्यादी बाबींसाठी पुरवठा विभागाने चौकशीअंती निलंबीत केले होते. यानंतर या दुकानदाराने आपल्या दुकानासमोर राजीनामा दिला असल्याचे फलकही लावलेले आहे. मात्र, शुक्रवारी रेशनचा माल बाहेती यांच्या दुकानात उतरल्याने नरसी गावात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात तहसीलदार गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, बाहेती यांनी रमेश परतानी यांच्या नावावर रेशन धान्य उचलले असल्याची माहीती त्यांनी दिली.
परतानी यांचा नरसी या गावाशी काहीही संबंध नाही. परतानी हे बाहेती यांचे भाचे आहेत, मात्र ते पंधरा वर्षापासून नांदेड या ठिकाणी स्थायिक आहेत. अशी माहीती ग्रामस्थांनी दिली आहे. या आधीही बाहेती यांनी दिगंबर गुगळे या मृत व्यक्तीच्या नावावर बनावट स्वाक्षरी करून माल उचलला होता. मृत व्यक्तीच्या नावावर माल उचलल्याने हा विषय तालुक्यात चांगलाच रंगला होता. ही बाब लक्षात येताच पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बाहेती यांच्या निलंबनाचे आदेश काढले. मात्र याकडे दुर्लक्ष करत तहसीलदारांनी बाहेती यांना रेशन माल पुरवठा केल्याचे समोर आले आहे. या सगळ्यामध्ये मात्र रेशनमालाचे लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासुन वंचीत आहेत.निदान आता तरी पुरवठा विभागाला जाग येऊन अपहार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:

हिंगोली- असेही हिंगोली जिल्हा रेशनचा काळाबाजार करण्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. याला जबाबदार पुरवठा विभागच असल्याचे आजच्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आलेय. चक्क विविध तक्रारीमुळे निलंबित केलेल्या रेशन दुकानदाराला पुन्हा आज रेशनचा पुरवठा करण्यात आल्याने जिल्ह्यात अजूनही काळाबाजार सुरू असल्याचे उघड झालेय. दुकानासमोर राजीनामा दिल्याचे फलक लावलेले असले तरीही माल टाकला जात असल्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Body:हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील माहिती या राशन दुकानदाराला मालाची अफरातफर वेळेवर धान्य न वाटप करणे, तसेच एकाच महिन्यात दोन महिन्याचे धान्य उचलून ते लंपास करणे हा सर्व चौकशीत निष्पन्न झाल्याने बाहेती या दुकानदाराला पुरवठा विभागाने निलंबित केले होते तसेच सदरील दुकानदाराने आपल्या दुकानासमोर मी राजीनामा दिला असल्याचे फलकही लावलेले आहे. मात्र आज अचानक रेशन चामाल बाहेती यांच्या दुकानात उतरल्याने नरसी या ठिकाणी एकच खळबळ उडाली. माल उचलण्यास संदर्भात तहसीलदार गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणतात की बाहेती यांनी रमेश परतानी यांच्या नावावर रेशन धान्य उचललेले आहे. वास्तविक पाहता परतानी यांचा नरसी या गावाशी काहीही संबंध नाही. केवळ ते बाहेती यांचे भाचे आहेत मात्र ते पंधरा वर्षापासून नांदेड या ठिकाणी स्थायिक आहेत. तरीदेखील परताने यांच्या नावावर सदरील दुकानदाराने माल उचलण्याचा गागवा खुद तहसीलदार शिंदे करतात. एवढेच नव्हे तर मयत झालेले दिगंबर गुगळे यांची देखील बनावट स्वाक्षरी करून बाहेती यांनी माल उचललेला आहे. त्यामुळे पुन्हा या गावातील लाभार्थ्यांना पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे मागचेच दिवस येण्याची शक्यता आहे. मात्र चक्क मैदा च्या नावानं वरही हिंगोलीत मान उचलला जाऊ शकतो हे या घटनेवरून समोर आलेय. पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबनाचे आदेश काढले होते. मात्र खुद्द तहसीलदारानी ते आदेश धुडकावून लावतात आज बाहेती यांना रेशनचा पुरवठा केल्यामुळे, आता तहसीलदार अन रेशन दुकांदारावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन महिन्यापासून लाभारती रेशन धान्यापासून वंचित आहेत. याला फक्त रेशन दुकानदार बाहेती आणि पुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.Conclusion:या सर्व प्रकारावर हे स्पष्ट होते की हा प्रकार केवळ हिंगोली तालुक्यातच नव्हे तर इतरही तालुक्यांमध्ये सुरू असावा, त्यामुळे वरिष्ठ स्तरावर याची चौकशी करण्याची मागणी लाभार्थ्याकडून होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.