ETV Bharat / state

गडचिरोली : अनेकांकडून खंडणी उकळणाऱ्या तथाकथित समाजसेविकेला अटक

author img

By

Published : Nov 8, 2020, 5:22 PM IST

महिला मंडळाच्या नावाखाली अनेकांच्या संसारामध्ये लुडबूड, प्रेम प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून अनेकांकडून हजारो रुपये खंडणी उकळणाऱ्या तथाकथित समाजसेवीकेला सिरोंचा पोलिसांनी अटक केली आहे. तिरूमला दासरी असे अटक करण्यात आलेल्या तथाकथित समाजसेविकेचे नाव आहे.

Sironcha police action
सिरोंचा पोलीस ठाणे

गडचिरोली - महिला मंडळाच्या नावाखाली अनेकांच्या संसारामध्ये लुडबूड, प्रेम प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून अनेकांकडून हजारो रुपये खंडणी उकळणाऱ्या तथाकथित समाजसेविकेला सिरोंचा पोलिसांनी अटक केली आहे. तथाकथित समाजसेविकेने अनेक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून लोकांना मनस्ताप दिला आहे. अशी अनेक प्रकरणे आता पोलिसांच्या चौकशीत उघड होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात बड्या लोकांना देखील अटक होण्याची शक्यता आहे. तिरूमला दासरी, असे अटक करण्यात आलेल्या तथाकथित समाजसेविकेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून सिरोंचा शहरासह लगतच्या अनेक गावांमध्ये तिरूमला दासरी या महिलेचे नाव चर्चेत आले होते. ती महिला मंडळाची स्वघोषित अध्यक्ष म्हणून अनेक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून तडजोडीच्या भूमिकेत वावरायची. सिरोंचा पोलिसांनी शुक्रवारी तिरूमला दासरीला एका तडजोडीच्या प्रकरणात खंडणी घेण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी तिच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

फिर्यादीकडून उकळले होते ७० हजार-

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचा लगतच्या गावामध्ये राहाणाऱ्या एका फिर्यादीचे तेलंगणातल्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मुलीने फिर्यादी तरुणासोबत विवाहाची तयारी केली होती. मात्र, तरुणाने विवाहाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर दासरीने फिर्यादीला चार लाख रुपयांची मागणी केली. मात्र, बोलणी केल्यानंतर फिर्यादीने तिरूमला दासरीला दोन लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यापैकी ३५ हजार रुपये प्रमाणे दोनदा ७० हजार रुपये दासरीला देण्यात आले. मात्र, नंतर फिर्यादी पुढील रक्कम देईल की नाही, याबाबत शंका आल्यामुळे दासरीने संबंधित फिर्यादीकडून मुद्रांकावर थकबाकी असल्याचे लिहून घेतले. फिर्यादीने रक्कम न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दासरीने दिली होती.

पोलिसांनी दाखल केले गंभीर गुन्हे-

अखेर या प्रकरणात पोलिसांनी तिरूमला दासरीवर 216/20 अंतर्गत कलम 417, 420 यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तिची कसून चौकशी केली जात आहे. तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अजय अहीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सेलोकर या प्रकरणाचा तपास करत आहे.

अवैध धंदे करणाऱ्याकडून उकळली रक्कम-

तिरूमला दासरीचा वावर गेल्या काही वर्षांत सिरोंचा परिसरातल्या अनेक नागरिकांसाठी दहशतीचा ठरलेला होता. ती अनेकवेळा सर्रास पोलीस ठाण्यात जाऊन बसायची आणि या भागात अवैध धंदे करणारे दारू विक्रेते, गुटखा आणि तंबाखू विक्रेत्यांना धमकावून त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा घ्यायची. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, महिला मंडळाची अधिकृत अध्यक्ष व सदस्य नसताना महिला मंडळाच्या अध्यक्षाच्या नावावर तिरूमलाने सिरोंचा तालुक्यात धुमाकूळ घातला होता.

कौटुंबिक कलहात तिरूमलाने मध्यस्थाची भूमिका बजावत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्याची चर्चा आहे. सोबतच अनेक प्रकरणांमध्ये तिने तडजोड करण्याच्या नावावर हजारो रुपये उकळल्याची माहितीही आहे.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत करणारे रडारवर-

तिरूमलाच्या वावरण्यावर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची नजर होती. आता मात्र तिरूमलाला अटक झाल्याने, ज्या लोकांनी तिला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत केली, अशा काही बड्या व्यक्तींनाही अटक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा- गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांवर, आतापर्यंत 60 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.