ETV Bharat / state

Tiger Killed Farmer in Chandrapur : गवत कापण्यास गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने केले ठार, चिमूर शहरानजीकची घटना

author img

By

Published : Dec 17, 2021, 8:52 PM IST

शेतकरी देविदास उर्फ बालु महादेव गायकवाड हे चिमूर नगर परिषद क्षेत्रातील सोनेगाव बेगडे येथील ( tiger attack on farmer in Sonegaon Begade ) रहिवाशी होते. ते १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शेतामधील गवत कापण्याकरीता गेले होते. मात्र, सायंकाळ झाली तरी ते घरी परत आले नव्हते. त्यांचा शोध घेतला असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर ( Tiger Killed Farmer in Chandrapur (आली.

मृत शेतकरी
मृत शेतकरी

चिमूर (चंद्रपूर ) - चिमूर शहरालगत वाघाचे वास्तव्य तीन-चार दिवसांपासून आहे. या वाघाने शेतात गवत कापायला गेलेल्या देविदास उर्फ बालू महादेव गायकवाड ( ४० वर्ष ) यांना हल्ला करून ठार ( Tiger Killed Farmer in Chandrapur ) केले. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान उघड झाली. शेतकरी गायकवाड हे १६ डिसेंबरपासून बेपत्ता होते.

शेतकरी देविदास उर्फ बालु महादेव गायकवाड हे चिमूर नगर परिषद क्षेत्रातील सोनेगाव बेगडे येथील ( tiger attack on farmer in Sonegaon Begade ) रहिवाशी होते. ते १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शेतामधील गवत कापण्याकरीता गेले होते. मात्र, सायंकाळ झाली तरी ते घरी परत आले नव्हते.

हेही वाचा-Tiger Killed In Chandrapur : वाघाला करंट देऊन मारले, मग जमिनीत पुरले; चार आरोपी अटकेत

बेपत्ता झाल्यानंतर शोध घेणाऱ्या गावातील तरुणांना सापडला मृतदेह-

गावाती तरुणांनी शेतात व इतरत्र बेपत्ता झालेल्या बालू गायकवडा यांचा शोध घेतला. मध्यरात्रीपर्यंत शोध घेतल्यानंतरही त्यांना शेतकरी बालू आढळून आले नव्हते. त्यामुळे त्यांचा भाऊ भास्कर यांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये देविदास उर्फ बालू गायब ( farmer Devidas death ) असल्याची तक्रार दिली. याच दरम्यान शोध घेणाऱ्या गावातील तरुणांना दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान विळा व रक्ताने भरलेली बालूचा रुमाल मिळाल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले. घटनेची माहीती चिमूर पोलीस तथा वन विभागाला देण्यात ( Chimur police and forest department ) आली.

हेही वाचा-Tiger Attacks In Chandrapur : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; पोंभुर्णा येथील घटना

घटनास्थळावर देविदास याचे शेतात विळा व रुमाल मिळाले. या स्थळापासून जवळपास ५०० मीटरच्या परीघात गायकवाड यांच्या शेताशेजारी अशलेल्या लक्ष्मण गायधनी यांच्या शेतात गायकवडा यांचे धड व मुंडके आढळले. पोलीस विभाग तथा वन विभागाकडून घटनास्थळाचा पंचणामा करण्यात आला. शवविच्छेदनाकरीता मृतदेह हा चिमूर उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा-TET Exam Scam :...तर 'त्या' विद्यार्थ्यांचीही चौकशी होणार - दत्तात्रय जगताप

सोनेगाव बेगळे येथील वाघाने माणसाला ठार करण्याची पहिलीच घटना आहे. या हल्ल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचा-Tiger In Chikhaldara : चिखलदरामध्ये जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघोबाचे दर्शन

सकाळी फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार ( Woman Killed in Tiger Attack ) केले. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावात घडली. संध्या विलास बावणे असे मृत महिलेचे नाव आहे.

पोंभुर्णा तालुक्यात महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

पोंभुर्णा तालुक्यात ( Porbhurna Taluka ) मागील काही महिन्यांत मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. अनेक लोकांवर येथे वाघाने हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्याचीच पुनरावृत्ती गुरुवारीही घडली. सकाळच्या सुमारास संध्या विलास बावणे (वय 35) ही महिला फिरायला गेली असता पोंभुर्णा मार्गावरील डॉ. पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. सकाळच्या सुमारास आजूबाजूला काही मुले होती. त्यांनी आरडाओरडा केली. मात्र या वाघाच्या हल्ल्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर वाघाने पळ काढला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.