चंद्रपूर : शहरातील राजीव गांधी काॕलेज ( Rajiv Gandhi College Chandrapur ) परिसरात दुर्मिळ पक्षांची शिकार ( Hunting for rare birds ) केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .शिकार केलेले पक्षी हातात घेऊन जात असतांना एका तरूणाचा व्हीडीओ वायरल ( Viral Video ) झाला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
व्हीडीओ समाजमाध्यमात वायरल - वन्यजीवांचा मोठा अधिवास असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शिकारीचे प्रमाण वाढले ( Poaching increased in Chandrapur district ) आहे. हिंस्र, तृणभक्षक प्राण्यांचा शिकारीचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, या जिल्ह्यातील पक्षी सुद्धा सूरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. थेट शहरातच पक्षांची शिकार केल्या जात असल्याचा व्हीडीओ समाजमाध्यमात वायरल ( video viral on social media ) झाला आहे. शिकार केलेले पक्षी राजरोसपणे हातात घेऊन तरूण जात आहे. त्याचा चेहऱ्यावर कुठलीच भिती नाही. उलट व्हीडीओ काढणाऱ्या तरूणालाच हा शिकारी तरूण घाबरवीत आहे. व्हीडीओ काढणाऱ्याला हा तरूण धमकावित आहे. "फोटो मत निकाल बोला ना तेरे कु..! समज नही आ रहा क्या..! एकबार बताया तो...! "असं बोलत आहे.
व्हीडीओ काढणाऱ्याने हा व्हीडीओ वन्यजीव संवर्धनाचा विडा उचललेल्या संस्थेचा अधिकृत व्हाॕटअप गृपमध्ये टाकलाय. हा विडीओ आज काढल्याचे त्याने लिहीलं आहे. राजीव गांधी काॕलेजचा अगदी समोर असलेल्या वस्तीकडे हा तरूण गेल्याचे विडीओ टाकणाऱ्याने लिहीलं. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Amruta Fadnavis Tweet : ये दोस्ती हम नही तोड़ेंगे; अमृता फडणवीसांची सूचक पोस्ट