चंद्रपूर - जिल्ह्यात एका तलावाचे खोदकाम सुरू असताना दुर्मिळ पंचमुखी ( Panchmukhi Shivling sculpture found in Chandrapur ) शिवलिंगाचे शिल्प आढळून आले. जिल्ह्यात पंचमुखी शिवलींगाचे शिल्प ( Panchmukhi Shivling sculpture ) सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिल्प तलावाच्या काठावर असलेल्या हेमाडपंतीय मंदिराचा ( Chandrapur Shivling sculpture ) गाभाऱ्यात ठेवण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी या तलावात यमदेवाचे शिल्प आढळून आले होते. त्यामुळे या उत्तखननात आणखी मोलाच्या ऐतिहासिक वास्तू सापडण्याची शक्यता वाढली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मुल तालुक्यातील भेजगाव येथील प्राचीन तलावाचे खोदकाम सूरू आहे. या तलावाच्या पाळीवर देखणे हेमाडपंथीय शिवमंदीर आहे. मागील काही दिवसांपासून या तलावाच्या खोलीकरणाचे काम सूरू आहे. आठवडाभरापूर्वीच येथे यमदेवाचे शिल्प मिळाले होते. बुधवारला खोदकामादरम्यान दुर्मिळ समजल्या जाणारे पंचमुखी शिवलींगाचे शिल्प सापडले. हे शिल्प अतिशय देखणे असून टेराकोटाने बनविलेल्या या शिल्पावर लाल मुलामा चढवलेला आहे. शिल्प पाच इंचाचे आहे. असे छोटेखाणी शिल्प पुजाअर्चेसाठी घरातील देवघरात ठेवले जात असे.
पंचमुखी शिवलींगाचे वैशिष्ट्य - पंचमुखी शिवलींगावर भगवान शिवची पाच शिल्पे कोरलेली असतात. शिवाचे पश्चिम मुख हे पृथ्वी तत्त्व म्हणून पुजले जाते. त्याचे उत्तर मुख हे जल तत्त्व, दक्षिण मुख हे तेजस तत्त्व आणि पूर्व मुख हे वायू तत्त्व म्हणून पुजले जाते. भगवान शिवचे वरचे मुख हे आकाश तत्त्व म्हणून पुजले जाते, असे अभ्यासक अरूण झगडकर यांनी सांगितले. पंचमुखी शिवलिंग शिल्पाचा वारीमार्ग तूटलेला आहे. हिंदू संस्कृतीनुसार खंडीत मूर्ती घरात ठेवल्या जात नाही. असे खंडीत शिल्प नदी किवा तलावात पुजापाठ करून विसर्जित केल्या जाते. आढळलेले शिल्प पंचमुखी शिवलिंगाचे आहे. हे दुर्मीळ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच असे शिल्प आढळले आहे.
हेही वाचा - सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक; डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन