ETV Bharat / state

चंद्रपूर : कारवाई करताना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक - अन्न व नागरी पुरवठा विभाग बातमी चंद्रपूर

सुगंधित गुटख्याची अवैध साठवणूक केल्याची माहिती मिळताच झडती घेण्यास गेलेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यावर दुकान मालकाच्या सदस्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात ते जखमी झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, एकाचा शोध पोलीस घेत आहेत.

कारवाई करताना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

author img

By

Published : May 29, 2020, 7:21 AM IST

चंद्रपूर - येथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार ते शहरातील अंचलेश्वर वॉर्ड येथील एका दुकानाची तपासणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुकान मालकाच्या सदस्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी सोनटक्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात ते जखमी झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात शहर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

आज अन्न सुरक्षा अधिकारी अमर सोनटक्के यांना सुगंधित तंबाखू साठवणूक संबंधी तक्रार प्राप्त झाली. याची शहानिशा करण्यासाठी ते वाहन चालक आणि एक सहकारी कर्मचाऱ्याला सोबत घेऊन अंचलेश्वर वॉर्डातील कन्नमवार चौक येथील येनूरकर किराणा स्टोअर या दुकानात पोहोचले होते. यावेळी दुकानाची झडती घेत असताना दुकानदार येनूरकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सोनटक्के यांना धमकावले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला लागले. या मारहाणीत सोनटक्के जखमी झाले. त्यांनी याची माहिती अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांना दिली. यानंतर पोलिसांसह तेथे जाऊन पाहणी केली असता, तिथे खर्रा(सुगंधित गुटखा) बनविण्याची मशीन आढळून आली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर, एकाचा शोध पोलीस घेत आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.