ETV Bharat / state

रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कोरोनाच्या संसर्गाने आलेल्या महामारीमध्ये संभाव्य रक्ताचा तुटवटा निर्माण होऊ नये याकरीता आपले राष्ट्रीय दायीत्व लक्षात घेऊन चिमूर येथील कुणबी समाज संघटनेच्या वतीने शासकीय रक्तपेढी ,चंद्रपूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Blood donation camp in Chimur, Chandrapur
रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
author img

By

Published : Apr 24, 2020, 5:15 PM IST

चिमूर - कोरोना विषाणुच्या संसर्गाने आलेल्या महामारीमध्ये संभाव्य रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. याकरीता आपले राष्ट्रीय दायीत्व लक्षात घेऊन चिमूर येथील कुणबी समाज संघटनेच्या वतीने शासकीय रक्तपेढी, चंद्रपूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

श्री गुरुदेव सांस्कृतीक भवन वडाळा ( पैकु ) चिमूर येथे सकाळी १० ते ४ च्या दरम्यान झालेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी स्वंयस्फुर्तीने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. देशात व राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या रुग्णात व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूतही दिवसागणीक वाढ होत आहे. अशा रुग्णाकरीता रक्ताची आवश्यकता असते. त्यांना रक्ताची कमतरता पडू नये यासाठी चिमूर कुणबी समाज संघटनेच्या वतीने २४ एप्रिल शुक्रवारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाट्न तहसीलदार संजय नागटिळक यांचे हस्ते जगतगुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुजनाने करण्यात आली. या प्रसंगी भिसी अप्पर तालुका तहसीलदार परीक्षित पाटील, चिमूर नगर परीषद मुख्याधिकारी मंगेश खवले इत्यादी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कुणबी समाजाच्या वतीने आयोजित या शिबिरा विषयी अधिकाऱ्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

शासकीय रक्तपेढीत उपलब्ध रक्तसंचय साहित्यानुसार ३३ रक्त दात्यांचे रक्त घेण्यात आले. याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय समाजसेवा अधीक्षक पंकज पवार, सहायक रक्त पेढी तंत्रज्ञ संदीप बडगे, अमोल जेद्देवार, अधिपरीचारक अंकीत ढोणे, परीचर लक्ष्मण नगराडे, रूपक कांबळे व वाहन चालक रुपेश भुमे यांनी कर्तव्य केले. शिबिरादरम्यान आयोजकाकडून आरोग्य विभागाचे स्वच्छते विषयीचे निर्देशानुसार हात स्वच्छते करीता सॅनीटायजर, रक्तदात्यास मॉस्क व सामाजिक दुरीता पाळण्यात आली. शिबीर यशस्वी करण्याकरीता, किर्ती रोकडे, गणपती ठाकरे, रमेश करारे, गजानन शिंदे, विनोद ढाकुणकर, बकाराम मालोदे, एकनाथ थुटे ,विनोद भोयर, बालाजी ढाकुणकर, पवन कारेकार् श्रीकांत चाफले, प्रमोद शास्त्रनकर, पवन ठाकरे, बंटी शिंदे, विलास वडस्कर, योगेश सोनटक्के, प्रशांत लढी, निलकंठ धोटे, विनोद अढाल, संजय सेडामे, रोहीत उरकुडे, संजय दुधनकर, भालचंद्र सोनटक्के यांनी प्रयत्न केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.