ETV Bharat / state

सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक; डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन - डॉ सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे वडील तसेच राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक डॉ. सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे आज ( 3 जून ) सायं, ७.१४ वाजता निधन ( Dr Sachchidanand Mungantiwar Passes Away ) झाले.

Sachchidanand Mungantiwar
Sachchidanand Mungantiwar
author img

By

Published : Jun 3, 2022, 10:49 PM IST

चंद्रपूर - भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे वडील तसेच राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक डॉ. सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे आज ( 3 जून ) सायं, ७.१४ वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्‍जवे या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास ( Dr Sachchidanand Mungantiwar Passes Away ) घेतला.

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्‍यूसमयी ९१ वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. १९६७ मध्‍ये त्‍यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्‍द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव आहे.

त्‍यांच्‍या पश्चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्‍नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्‍त परिवार आहे. त्‍यांचे पार्थिव शनिवार ( ४ जून ) रोजी सकाळी १०.३० वा. चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यांची अंत्‍ययात्रा सायं, ४.३० वा. त्‍यांच्‍या कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार येतील.

हेही वाचा - तुझे लग्न दुसरीकडे होऊच देणार नाही! 40 वर्षीय प्रेयसीच्या धमकीने हताश प्रियकराची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.