ETV Bharat / state

बुलडाण्याच्या मासरुळमध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या

मासरुळ येथील 21 वर्षीय तरुणाची लाकडी फळी व दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुलडाण्याच्या मासरुळमध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या
author img

By

Published : Jun 15, 2019, 8:30 PM IST

Updated : Jun 15, 2019, 9:43 PM IST

बुलडाणा - मासरुळ येथील 21 वर्षीय तरुणाची लाकडी फळी व दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली असून पारध तालुका भोकरदन येथील राजश्री शाहू महाविद्यालयाजवळ युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. स्वप्नील श्रीरंग भुते (वय-21, रा. मासरुळ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारध भोकरदन रोडवरवरील राजश्री शाहू महाविद्यालयाजवळ असलेल्या श्रीरंग दगडू सुरडकर यांच्या शेतात बांधावर एका युवकाचा मृतदेह असल्याची प्रभू सुरडकर यांनी पारध पोलिसांना माहिती दिली. प्राप्त माहितीवरुन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी या युवकाचा लाकडी फळी व दगडाने ठेचून हत्या केल्याचे आढळून आले. या ठिकाणी मृताच्या खिशात असलेल्या आधार कार्डवरुन हा तरुण बुलडाणा जिल्ह्यातील मासरुळ येथील असल्याचे समोर आले.

त्यानुसार घटनेची माहिती मिळताच भोकरदन उपविभागीय पोलीस अभिकारी सुनिल जायभाये यांनीही घटनास्थळाला भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकलाही पाचारण करण्यात आले. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. याप्रकरणी पुढील तपास सह पोलीस निरिक्षक शंकर शिंदे करत आहेत.

Intro:Body:बुलडाणा:- मासरुळ येथील 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणांचा डोक्यात लाकडी राफ्टर घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 14 जून रोजी सायंकाळी उघडकीस आली. स्वप्नील श्रीरंग भुते, वय 21 रा. मासरुळ असे मृत युवकाचे नाव असून पारध ता. भोकरदन जी. जालना येथील राजश्री शाहू महाविद्यालयाजवळ काल सायंकाळी स्वप्नीलचा रक्तच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळुन आला. डोक्याखाली दगड ठेवून वरुन लाकडी राफ्टरने वार करत स्वप्नीलची अंत्यत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पारध पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत आहे.

पारध भोकरदन रोडवर असलेल्या राजश्री शाहू महाविद्यालयापासून अंदाजे अर्धा किमी अंतरावर असलेल्या श्रीरंग दगडू सुरडकर यांच्या शेतातील बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाखाली एका युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची खबर पारध येथील प्रभू दामू सुरडकर यांनी पारध पोलिस स्टेशनला दिली. सदरील माहीतीवरुन पारध पोलिस ठाण्याचे स.पो.नि.शंकर शिंदे स.फौजदार उबाळे पो.ना.प्रकाश शिनकर, दिनेश पायघन,नागरे,जाधव,आदींच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पाहणी केली असता सदरील युवकाचा लाकडी फळी व दगडाने ठेचुन निर्घृण खून केला असल्याचे आढळून आले. मृतकाच्या खिशात असलेल्या आधार कार्ड वरुन हा तरुन बुलडाणा जिल्ह्यातील मासरुळ येथील स्वप्नील श्रीरंग भुते असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवीत आरोपींचा शोध सुरु केला. घटनेची माहिती समजताच भोकरदन उपविभागीय पोलिस अभिकारी सुनिल जायभाये यांनीही घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकलाही पाचारण करण्यात आले. मात्र त्यात यश मिळले नाही. स्वप्नील भुते ह्या सुस्वभावी तरुणांचा इतका निर्दयी पणे खून का करण्यात आला, याचं कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान याप्रकरणी पारध पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विविध पथके तयार केली असल्याची माहिती आहे. प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नी.शंकर शिंदे हे करीत आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Jun 15, 2019, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.