बुलडाणा - मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र तरी देखील जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 10 दिवस कडक लॉकडाऊची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून 20 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पूर्व तायरी म्हणून आज नगर परिषदेच्या वतीने शहराच्या विविध भागात 44 ठिकाणी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, पुढील दहा दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळी मुख्यधिकारी महेश वाघमोडे,उपमुख्यधिकारी स्वाप्नील लघाने यांच्यासह खाते प्रमुख व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
राज्य सरकारने 14 एप्रिलपासून घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेचे कारण समोर करून, नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत, त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 पासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. लॉकडाऊनच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून पूर्व तयारी करण्यात आली आहे. शहरात 44 ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. याशिवाय नगर परिषदेच्या वतीने 10 पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त बाहेर पडल्यास पोलिसांकडून वाहन जप्तीसह नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - मोदी सरकार लोकांचे खिसे कापतंय; इंधन दरवाढवरुन नवाब मलिकाचा मोदी सरकारवर घणाघात