बुलडाणा - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नसून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आता आरोग्य यंत्रणा स्पशेल फेल ठरत असल्याचे चित्र बुलडाण्यात पाहायला मिळत आहे, बुलडाणा शहरातील 80 बेड असलेल्या अपंग विद्यालयाच्या कोविड सेंटरकडे जिल्हा प्रशासनाचा दुर्लक्ष असल्याने हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या जीवावर उठले आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसह कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे.
हेही वाचा - खामगावात सरकी गोडाऊनला आग, कोट्यवधींचे नुकसान
बुलडाण्याचे अपंग विद्यालय, हे 80 बेड ची व्यवस्था असलेले हे बुलडाण्यातील दुसऱ्या क्रमांकाचं कोविड सेंटर आहे, या कोविड सेंटरमध्ये 80 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. ज्यामध्ये बरेचशे रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर आहेत. मात्र याठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर सिलेंडर फक्त बाजूला ठेवलेले आहेत, एकाही रुग्णाला ऑक्सिजन लावलेले नाही, तर रुग्णांच्या खाटा अत्यंत जवळ लावलेल्या आहेत, त्यामुळे सोशल डिस्टनसिंग किती काटेकोर पण पाळलं जातंय हे समोर येते. शिवाय या कोविड सेंटरमध्ये सफाई कामगार नसल्याने गेल्या आठवड्यापासून साफ-सफाई झालेली नाही. त्यामुळे वार्डात आणि परिसरात उरलेलं अन्न , हॅन्डग्लोज, औषधी यासह इतर केरकचरा ठिकठिकाणी पडलाय. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून हे घाणीचे साम्राज्य पाहता त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने एक नर्स ही 80 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार देत आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाल्याने प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे हे सर्व भयानक चित्र आहे.
या कारणाने नर्स कर्मचाऱ्यांचे पती झाले पॉझिटिव्ह
शस्त्रसाठा आणि दारू गोळा नसेल तर युद्धात पराभव निश्चित आहे, तसेच रुग्णालयात औषधसाठा आणी सुविधा नसल्यास रुग्णांणी या कोरोनाच्या युद्धावर मात कशी करायची. यासर्व बाबतीत अभाव असल्याने याठिकाचे कर्मचारीही आता हतबल झाले आहेत. तर नाईट ड्युटीसाठी महिला कर्मचाऱ्यांच्या सोबतीला महिला कर्मचारी नसल्याने त्यांना पतीला सोबत घेऊन येण्याची वेळ आली आहे. आपल्या पत्नीसोबत रुग्णालयात सोबत राहून राहून ही व्यक्ती सुद्धा पॉझिटिव्ह निघाली आहे.
येत्या दिवसात बंड पुकारण्याच्या तयारीत
सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांसह त्यांचे नातेवाईकही आता संतापले आहेत. त्यामुळे या युद्धावर विजय मिळवायचा असेल तर प्रशासनाने या कोविड सेंटरकडे लक्ष देऊन रुग्णाच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा आणि औषधसाठा... स्वच्छता कर्मचारी, नर्स यांची काही प्रमाणात तरी व्यवस्था करावी, अन्यथा येत्या दिवसात कर्मचाऱ्यांसह रुग्ण व त्यांचे नातेवाईक बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत.
रुग्णांनी काळजी करू नये, व्यवस्था करण्यात येत आहे - जिल्हा शल्यचिकित्सक
अपंग विद्यालय कोविड सेंटर या आगोदर तालुका आरोग्य अधिकारी यांचे होता. काही दिवसांपूर्वी ते आमच्या ताब्यात आलेला आहे. त्यामुळे या सेंटरमध्ये औषधी साठा वाढवून, ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कोविड सेंटरची साफ-सफाई करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची भरतीचा विषय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणारी कोविड समिती समोर आहे. मान्यता मिळताच तत्काळ कर्मचारी भरण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली आहे.
हेही वाचा - बुलडाणा : कोविडची टेस्ट न करताच रुग्णाला दिले रेमडेसिवीरचे इजेक्शन, रुग्णाचा मृत्यू