ETV Bharat / state

पहिल्यांदाच बीडमध्ये भरले रानभाज्या प्रदर्शन; शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाचा पुढाकार

author img

By

Published : Aug 10, 2020, 3:46 PM IST

९ ऑगस्ट रोजी बीड शहरातील सामाजिक भवन परिसरात रानभाज्यांचे प्रदर्शन कृषी विभाग व आत्मा विभागाच्या वतीने भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात नागरिकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करून प्रतिसाद दिला. यावेळी रानभाज्यांसह त्यांच्या पाककृतीची माहिती देखील प्रदर्शनादरम्यान उपलब्ध करून देण्यात आली होती.

रानभाज्या प्रदर्शन
रानभाज्या प्रदर्शन

बीड - निसर्ग माणवाला भरभरून देतो, एवढेच नाही तर निसर्गाने दिलेले प्रत्येक फळ, फुल आणि वनस्पती माणसाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. शेतकरी आपल्या शेतातील गवत व इतर तण उपटून बांधावर फेकतो. मात्र बांधावर फेकलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गवतामध्ये माणसाच्या शरीरासाठी लाभदायक असलेल्या अनेक रानभाज्या असतात, याची अनेकांना कल्पनाच नसते. याची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी या उद्देशाने कृषी विभागाने रविवारी बीड शहरात रानभाज्या प्रदर्शन भरवले होते. याला शहरी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

बीडमधील रानभाज्या प्रदर्शन
९ ऑगस्ट रोजी बीड शहरातील सामाजिक भवन परिसरात रानभाज्यांचे प्रदर्शन कृषी विभाग व आत्मा विभागाच्या वतीने भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात नागरिकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करून प्रतिसाद दिला. यावेळी रानभाज्यांसह त्यांच्या पाककृतीची माहिती देखील प्रदर्शनादरम्यान उपलब्ध करून देण्यात आली होती.

पावसाळ्यात शेतात किंवा डोंगररांगात मोठ्या प्रमाणात कर्टुले, तांदुळजा, तांबोळी, भोकर, पाथरी, शेवग्याची पाने-फुलं, तांदुळजा, आळू, टाकळा, घोळ, केना, कुरडू, आघाडा, उंबर, चिवळ यासह इतर रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, पिकांमध्ये येत असल्यामुळे शेतकरी त्याची खुरपणी करतो. मात्र, नैसर्गिकरित्या आलेल्या या रानभाज्यांचा मानवी आहारात वापर केला जाऊ शकतो. तसेच पुर्वीच्या काळापासून शेतकरी यापैकी अनेक रानभाज्या घरी हंगामानुसार वापरत खाण्यासाठी उपयोगात आणत राहिला आहे. मात्र, शहरातील नागरिकांना देखील याची माहिती व्हावी व त्यांनी देखील याचा वापर करावा, यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभरात रानभाज्यांचा उपक्रम राबवण्यात आला.

हेही वाचा - राज्यातील 'पाणी व स्वच्छता मिशन'मधील तीन हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

सकाळी ११ वाजता उद्घाटनाने रानभाजी प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी विभाग व आत्माचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आत्माचे संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, मंडळ कृषी अधिकारी बी.मुनेश्वर यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना रानभाज्या व त्याचे औषधी गुणधर्म याविषयी आत्माचे संचालक दत्तात्रय मुळे यांनी मार्गदर्शन केले. तर, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या रानभाज्यांचे वैशिष्ट्य तसे पाककृती याविषयी माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील मनोहर शिरसाट, संतोष काशिद, महेश सावरे, डी. डी. जळक, दयानंद खांबकर, बाबुराव बहिरवाळ, अमोल ढेपे, हावळे, मुकेश भागडे, संजय गावडे, व्ही.एस.बांगर, श्रीपाद उबाळे, थोरात, बोचरे आत्माचे जुबेर पठाण, अशोक काळे, शेख नुमान, गाजी, किशोर धांडे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा - पाणी वाचवण्यासाठी धोरण-हेतू आवश्यक; पाहा, मार्ग दाखवणारी शिमल्यातील आयआयएएस संस्था

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.