ETV Bharat / state

ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करा; माकपचे रास्ता रोको

author img

By

Published : Nov 2, 2019, 7:46 PM IST

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी माकपने रास्ता रोको आंदोलन केले.

बीडमध्ये माकपचे रास्ता रोको आंदोलन

बीड - जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील आठ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून हेक्‍टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी करत शनिवारी माकपने बीड जिल्ह्यातील तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

बीडमध्ये माकपचे रास्ता रोको

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. प्रशासनाने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकानी अद्याप पंचनामे केले नाहीत, पंचनामे त्वरित करावेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये मदत नुकसान भरपाई द्यावी, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोहन जाधव, बाबा सर यांच्या नेतृत्वा खाली तालखेड फाटा येथे शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले.

शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर गहू आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पंचनामे करण्यासाठी अद्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येत नाही. शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी माकपच्या वतीने केली. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, दोन तास रास्ता रोको चालला. यावेळी माकपचे मोहन जाधव, तालुका सचिव कॉम्रेड बाबा, विनायक चव्हाण, सय्यद याकुब, आबा राठोड, रोहीदास जाधव, विजय राठोड, गुलाब मोरे, पंडित ओवाळ, नयुम कुरशी, रुपेश चव्हाण यांची उपस्थिती होती.

Intro:ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करा; माकप चे रास्ता रोको आंदोलन

बीड- जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे मागील आठ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून हेक्‍टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी करत शनिवारी माकपने बीड जिल्ह्यातील तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे, शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, प्रशासनाने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत मात्र तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकानी अध्याप पंचनामे केले नाहीत, पंचनामे त्वरित करावेत व शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये मदत नुकसान भरपाई
द्यावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोहन जाधव, बाबा सर यांच्या नेतृत्वा खाली तालखेड फाटा येथे शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर गहू आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे करण्यासाठी अद्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येत नाही, शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे, यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी माकपच्या वतीने केली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, दोन तास रास्ता रोको चालला. यावेळी माकप चे मोहन जाधव, तालुका सचिव कॉ बाबा , विनायक चव्हाण, अँड सय्यद याकुब, आबा राठोड, रोहीदास जाधव, विजय राठोड, गुलाब मोरे, पंडित ओवाळ, नयुम कुरशी, रुपेश चव्हाण यांची उपस्थिती होती.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.